महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या हस्ते नोबेल शांती पुरस्कार प्राप्तकर्ते कैलाश सत्यार्थी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .

Bps live news network

नागपूर :अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो, वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य रुपये खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपून महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या हस्ते नोबेल शांती पुरस्कार प्राप्तकर्ते कैलाश सत्यार्थी यांचा वाढदिवस सुरक्षित बालपन दिवस म्हणून तसेच चित्रकला स्पर्धा घेऊन आश्रम , शाळा येथे विद्यार्थ्यंबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले.

कार्यक्रमाला पार पाडण्यात हनी कॉन्व्हेन्ट शाळाचे मुख्याध्यापिका मिसेस बागडे मॅडम व शिक्षक बागडे यांनी मोलाचे कार्य केले.

तसेच कार्यक्रमांतर्गत आस्था बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ममता सायम , गगन भरारी संस्थाच्या अध्यक्षा वर्षा पाटील , महिमा बहुउदेशीय सामाजिक संस्थाच्या सपोर्ट पर्सन राणी कळमकर , संस्थाच्या वोलेंटीअर(स्वयंसेवी) महिमा पाटील , रेवती चारकोल , आस्था सायम इत्यादि पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .