निपाणी वडगावच्या उपसरपंच पदी सारिका विलास जाधव यांची बिनविरोध निवड. .! ! श्रीरामपूर--: :

निपाणी वडगावच्या उपसरपंच पदी सारिका विलास जाधव यांची बिनविरोध निवड. .! ! श्रीरामपूर--: :

श्रीरामपूर तालुक्याच्या नजीक असणारे निपाणी वडगाव हे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गावामध्ये मोडले जाते.निपाणी वडगाव ग्रामपंचायतच्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी सारिका विलास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या वेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत दर्शने यांनी काम पाहिले तर त्यांना कामगार तलाठी श्रीमती सोनवणे यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतचे उपसरपंच आबासाहेब राऊत यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त असल्यामुळे उपसरपंच पद निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेतली असता  या पदासाठी सारिका जाधव यांचा एकच अर्ज दाखल झाला असता त्यांची उपसरपंच पदा करिता बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.  
  माजी आमदार भानुदास मुरकुटे मुळा प्रवरा सोसायटीचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे अशोक कारखाना संचालक सोपानराव राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक गोराने बाबा, विठ्ठलराव राऊत, प्राध्यापक सुनिताताई गायकवाड, विद्यमान सरपंच राऊत ताई, दादासाहेब राऊत, बाजीराव राऊत,हौशीराम देवकर,विश्वास भोसले,संजय गायधने, राजेंद्र काळे,दिलीप राऊत,ज्ञानेश्वर पडोळे,संजय राऊत,कृष्णाताई कुंदे,सविताताई देवकर, अर्चनाताई मोरे, अलकाताई म्हैसमाळे,आबासाहेब राऊत, सर्जेराव देवकर,अक्षय राऊत, जगन्नाथ राऊत,फिरोज पठाण, रवींद्र पवार,शोभाताई साळवे, चंद्रकला गायधने,जगन्नाथ जाधव,हे उपस्थित होते.   
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव देवकर यांनी केले तर आभार रवींद्र पवार यांनी मांनले.