*थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन*
*थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन*
नागपूर जिल्हा प्रतिनिधी सुनील सोमकुंवर
*गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,तसेच गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त
सहभाग*
*अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली*
*सावनेरःथोर नाटकार साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधि ने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा जपनार्या सर्व संस्थांनी कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्ताने कोवीड़19 च्या वाढत्या संसर्गामुळे सकाळी 9-00 वाजता पासून त्यांचे निवास स्थान,समाधी स्थळ,पुतळा व गणेश वाचनालय येथे पोहचून कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करित त्यांना भावपूर्ण श्रध्दांजलि वाहली.*
*कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथि निमित्त पुरातत्व विभाग नागपूर व्दारे गडकरी निवास स्थानाला सुंदर असे फुल माला व विद्यूत रोशनाई ने तर नगर पालिका सावनेर व्दारे समाधी स्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती हे विशेष...*
*कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्ताने सर्वप्रथम गणेश वाचनालय सावनेर येथे अँड् चंद्रशेखर बरेठीया,डॉ.विजय धोटे,समाजसेवी गोपाल घटे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुण तर गडकरी पुतळा व समाधी स्थळ,तसेच निवासस्थानी पोहचून कै.राम गणेश गडकरी युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष किशोर ढुंढेले,सचिव प्रथमेश देशपांडे,मुकेश झरबडे,राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे,सचिव प्रा.विजय टेकाडे व शिक्षक वु्ंद, गडकरी स्मृती निलयम चे श्याम धोटे,राजेश पेंढारी सह अनेक गडकरी प्रेमींनी थोर साहित्यिक,नाटककार कै राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीला उजाळा दीला*
*याप्रसंगी नगर परिषद सावनेर व्दारे पुतळा व समाधी स्थाळाला तसेच पुरातत्व विभाग नागपुर व्दारे निवास स्थानाला पुष्षमालां व विध्युत रोशनाईने आकर्षक रित्या सजवीण्यात आले*
*याप्रसंगी शंकर ढोके,अँड् पुरे,सुधाकर दहिकर,रघुनंदन जामदार,संजय बन आदीसह शेकडो गडकरी प्रेमी उपस्थित होते*