*वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन**गट ग्रामपं चायत उमरी ( पाली) चा भोंगळ कारभार विरोधात आंदोलन*

*वंचित बहुजन आघाडी तर्फे धरना आंदोलन*
*गट ग्रामपंचायत उमरी(पाली) च्या भोंगळ कारभार विरोधात आंदोलन*
                                                                                          बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज दिल्ली.                                                                                                                  पारशिवनी:- तहसील येथील गट ग्रामपंचायत उमरी (पाली) त.पारशिवनी येथे शासन-प्रशासनाच्या उदासीन धोरण व भोंगळ कारभार मुळे जनतेच्या समस्या वाढत आहे व ग्रामपंचायत चे दुर्लक्ष आहे.
    करिता *मा.भगवान भोंडे, पूर्व विदर्भ संयोजक* यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरना आंदोलन ग्रामपंचायत च्या पटांगनात घेण्यात आला. 
   धरना आंदोलन ला गावातील सरपंच व सचिव यांनी भेट देवून गावातील समस्यावर चर्चा करित 8 दिवसात कारवाही करण्याचे आश्वासन दिले.
   *पंचायत समिति खंडविकास अधिकारी जाधव सर* यांना आंदोलना च्या मांगनी चे निवेदन सादर करण्यात आले.
*1) पाली गावात 2019 मधे पुरात क्षतिग्रस्त पाण्याची टाकी दुरुस्त करून गावात स्वच्छ पिण्याचे पानी द्यावे.*
*2) आवास योजना अंतर्गत घरकुल करिता 65 नागरिकाचे नाव कमी करण्यात आले असून ती यादी दुरुस्त करने.*
*3) मनरेगाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी करून कारवाही करने.*
*4) पाली हद्दितील मैगनीज खदान ची कर आकारणी करने व 3 वर्षाचा सी एस आर निधि गावातील विकास कामात खर्च करण्याबाबद मैगनीज खदान ला पत्र देनें काम न केल्यास नाहरकत प्रमाणपत्र रद्द करणे.*
 धरना आंदोलन च्या माध्यमाने वरील मांगण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
   याप्रसंगी आंदोलनात *अजय सहारे जिल्हामहासचिव,कल्याण अडकने जिल्हाप्रवक्ता,संतोष बोरकर शहर अध्यक्ष,पुनादास गजभिये,भगवान केवट,वलोकर काकाजी,कोमल राऊत,महेश प्रधान,शिवाजी,निखिल ढोरे,विशाल डोनारकर,प्रमोद सोनवाने* इत्यादि गावातील नागरिक उपस्थित होते.