महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर येथे भारतीय पत्रकार संघटनची जिल्हा स्तरीयबैठक संपन्न.

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर येथे भारतीय पत्रकार संघटनची जिल्हा स्तरीयबैठक संपन्न.

राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारतीय पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.जेष्ठ पत्रकार आर. आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी जिल्हा अध्यक्ष कृष्णा गायकवाड व जिल्हा कोऑर्डीनेटर सचिन पवार यांनीही अनमोल मार्गदर्शन केले.

या बैठकी दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सध्या येणाऱ्या कोरोना महामारी ,विषयी चर्चा करून त्या नुसार समाजातील सर्व नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे .व या विषयी मार्गदर्शन करून समाज जागृत करण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आर. आर .जाधव यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना सांगितले.  

  विशेषतः या बैठकीत मध्ये एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून BPS NEWS मध्ये आर्टिकल कसे समाविष्ट करावे हे प्रकाश निकाळे व आदिनाथ केदार यांनी सांगितले.

या वेळी अहमदनगर जिल्ह्याचे बी पी एस लाईव्ह न्युज चॅनल चे आदिनाथ केदार, संभाजी शिंदे, प्रकाश निकाळे, इन्नुस पठाण,दीपक कदम, यशवंतराव पाटेकर, प्रगत कराड आदी पत्रकार उपस्थित होते.

बी पी एस न्युज नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण