महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन. .!!
अहमदनगर :- साईबाबा शिर्डी नगरीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,तसेच शिर्डी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.