तळीये गावात शिमगा उत्सव मोठ्या आनंदात साजरा.

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील तळीये गावात सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीनिमित्त गावात एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. . होळी पेटविण्यापूर्वी मंदिरातील परिसर स्वच्छ करण्यात आला, परिसरात रांगोळी काढून परिसर सजवला गेला. होळीलाही सजवून तीची पूजा केली . गावातील लोकांनी पारंपरिक पद्धतीने तिची पूजा केली , नवस बोललेत,सगळय़ा आनंदात बोंब माराता त्याला आणखी साज चढला. व गावात सुख शांताता नांदण्यासाठी होलिके मातेला प्रार्थना करत कार्यक्रमाची सांगता केली.