हिंगणगाव परीसरामध्ये बिबट्याचे दर्शन
हिंगणगाव परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन
शेवगाव प्रतिनिधी :- यशवंत पाटेकर
शेवगाव तालुक्यामध्ये हिंगणगाव परिसरामध्ये दोन दिवसापासून बिबट्याची दहशत चालू आहे. हिंगणगाव येथील शेतकरी श्री रावसाहेब पवार यांच्या वस्तीवर सलग दोन दिवस बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरातील सर्व वस्तीवाले घाबरून गेले आहे. सदर घटनेची माहिती शिवाजी पवार यांनी फोनवरून शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस श्री संदीपराव बामदळे यांना दिली असता. त्यांनी तात्काळ वन विभागाची संपर्क करून वन विभागाचे अधिकारी श्री वेताळ साहेब यांना कल्पना दिली. व वन विभागाने तात्काळ दखल घेऊन एक तासामध्ये घटनास्थळी हजर होऊन बिबट्याचे ठस्याची तपासनी केली व सदर ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले याप्रसंगी परीसरातील शेतकरी सतीश पवार. गुरुजी पवार .ज्ञानेश्वर पवार .पांडुरंग पारठे .कानिफनाथ धुमाळ. इत्यादी सर्व कार्यकर्त्यांनी वेताळ साहेब यांना पिंजरा लावण्याची विनंती केली त्यांनी सदर विनंती तात्काळ मान्य करून आज दिनांक 5 / 6 / 2022 रोजी दुपारी चार वाजता पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.