*तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत डिग्रस शाळेचे वंदे मातरम समूहगीत तालुक्यात प्रथम*

*तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत डिग्रस शाळेचे वंदे मातरम समूहगीत तालुक्यात प्रथम*

_नुकत्याच संपन्न झालेल्या राहुरी तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धेत समूहगीत गायन( इयत्ता पाचवी ते आठवी) गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले वंदे मातरम या समूहगीताने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे_. 

   _या समूहगीताचे लेखन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग चौहान यांनी केले असून शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री शंकर आंबेकर सर, वैशाली चौहान मॅडम, स्वप्नाली निरगुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनीच उत्कृष्ट प्रकारे वादन केले आहे_.

  _सदर विद्यार्थिनींना वर्ग शिक्षिका प्रज्ञा लगड मॅडम वर्गशिक्षक अर्जुन खैरे सर वर्ग शिक्षक रवींद्र अरगडे सर आदींसह

 डिग्रस शाळेचे मुख्याध्यापक

 राजाराम झावरे सर,सिंधू पंडित मॅडम, मुकेश कचरे सर आदींचे मार्गदर्शन लाभले_.

    _विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे साहेब, बीट विस्ताराधिकारी सौ.जयश्री कार्ले मॅडम, केंद्रप्रमुख श्रीमती विद्या भागवत मॅडम, डिग्रस गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.रेणुकाताई गावडे, उपसरपंच श्री. रावसाहेब पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री ज्ञानदेव येणारे, उपाध्यक्ष सौ. भाग्यश्री सुनील मनोहर, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ श्री. अमोल बेल्हेकर, श्री. योगेश बेल्हेकर,माजी पंचायत समिती सदस्य श्री. सचिन भिंगारदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले आहे_