राहुरी कृषी विद्यापीठ बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ चालुच. अभियत्यांकडून अधिकाराचा गैरवापर अधिकार्‍यांना वरदहस्त कोणाचा.

राहुरी कृषी विद्यापीठ बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ चालुच. अभियत्यांकडून अधिकाराचा गैरवापर अधिकार्‍यांना वरदहस्त कोणाचा.

प्रतिनिधी राज्यात अव्वल दर्जा असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभाराला पाठबळ कोणाचे असा सवाल विद्यापीठ परिसरात होत आहे

ठेकेदाराकडे थेट पैशाची मागणी करणारी कॉल रेकॉर्डिग होऊनही त्या कंत्राटी अभियंत्याला कामावर रुजू करून घेण्यात आले त्यानंतर अशाच एका वादग्रस्त ठरलेल्या कंत्राटी महिला अभियंत्याला नुकतीच नियुक्ती देण्यात आली राहुरी कृषी विद्यापीठ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही कंत्राटी अभियंत्याच्या कामकाजाबाबत नेहमीच वाद निर्माण झाले आहेत

काही दिवसापूर्वीच एका कंत्राटी अभियंतानी एका कंत्राटदारालासंपर्क साधत लग्न समारंभासाठी उघडपणे लाच मागितल्याची कॉल रेकॉर्डिंग मध्ये

उघड होऊन याबाबत विद्यापीठ परिसरात झाली विद्यापीठाचे कर्तव्यनिष्ठ म्हणून समजले जाणारे कुलगुरू व वरिष्ठ अधिकारी थेट कारवाई करतील व भ्रष्टाचारी अधिकार्‍याला नियुक्ती देणार नाहीत

अशी चर्चा असतानाच असे काही न घडता रेकॉर्डिंग वायरल झालेल्या कंत्राटी अभियंत्याला विद्यापीठात पुनर्नियुक्ती देण्यात आली होती

संबंधीत कंत्राटी अभियंत्याला कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात

हजर करण्यात आल्याचे समजले व चौकशी पासून वाचविण्यात आल्याचे दिसून येते त्या प्रकरणाची चर्चा संपत नाही तोच वादग्रस्त ठरलेल्या एका महिला कंत्राटी अभियंत्याकडून पदाचा गैरवापर होऊन वातानुकुलीत यंत्रे (AC ) व विद्युत विभागातील कामे आपल्याच कुटुंबातील ठेकेदारांना ती कामे देण्यात आल्याचे समोर आले आहे संबंधीत कंत्राटी महिला अभियंत्याच्या नातलगांनी स्थापीत केलेल्या चार एजन्सीलाच दिले जात असलेने विद्यापीठात चांगली चर्चा रंगत आहे

सदर कंत्राटी महिला अभियंत्याच्या कुटुंबाने स्थापीत केलेल्या एजन्सीकडे गरजेचे असनारे सार्वजनिक बांधकाम विभाग व सैन्यदलाचे नाहरकत प्रमाणपत्र नसलेची गंभीर बाब समोर आली आहे

संबंधीत महिला अभियंत्यांकडून कोट्यावधीची कामे स्वतच्या नातलगांना दिल्याचे बोलले जात असलेने कुलगुरू,विद्यापी अभियंता यांच्याकडून प्रकरणाची सखोल चौकशी होईल अशी चर्चा होत होती परंतू विद्यापीठ बांधकाम विभागामध्ये नेहमी प्रमाणेच पाठराखण केल्याचा प्रकार समोर आला आहे

नमुद वादग्रस्त महिला अभियंत्याला पुनर्नियुक्ती दिल्याने ही बाब समोर आली आहे यावरून या वादग्रस्त अभियंत्यांना वरिष्ठाचेच पाठबळ मिळत असलेची चर्चा आहे

दरम्याण राहुरी कृषी विद्यापीठात बांधकाम विभाग हा नेहमीच वादग्रस्त ठरलेला असून या नविन प्रकारामुळे पुनश्च चर्चेत आला आहे

अधिकार्‍याने सांगीतले तरच प्रवेश

राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वी केवळ नाव भ्रमणव्धनी क्रमांक व ज्या विभागात जायचे आहे त्या विभागाची माहिती घेतली जात होती परंतु विद्यापीठातील अनागोंदी कारभार बाहेर पडत असलेने विषेशताहा बांधकाम विभागातील कामकाज किंवा इतर कामासाठी येणाऱ्या व्यक्तीची/ शेतकर्‍यांची प्रवेश द्वारातच कसून चौकशी केली जाते बांधकाम विभागात जानाऱ्या प्रत्येक व्यक्तींची संशयाच्या नजरेने तपासणी होऊन अधीकार्‍यांची परवानगी घेऊन त्यांचा होकार असेल तरच भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्याचा प्रकार सूरू आहे 

शासनाने पांढरा हत्ती म्हणून पोसत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या अधिकार्‍यांवर अंकुश ठेऊन कामकाज केले तरच राहुरी कृषी विद्यापीठाची होणारी वाताहात थांबेल अन्यथा विद्यापीठ बांधकाम विभागातील अधिकार्‍याकडून नेहमी प्रमाणेच अनागोंदी कारभार चालु राहील्यास राहुरी कृषी विद्यापीठाचा बांधकाम विभाग शासनाच्या डोक्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या शिवाय राहणार नाहीत अशी मागणी सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गातून होत आहे.