तुकोबांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान
प्रतिनिधी-कोरोनामुळे खंड पडलेल्या पालखी सोहळ्याचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले.आमदार सुनील शेळके तसेच आमदार रोहित पवार व लाखो वारकऱ्यांचा उपस्थितीत हा प्रस्थान सोहळा पार पडला.या 337 व्या पालखी प्रस्थान सोहळ्या साठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सकाळी संत तुकाराम महाराज शिळा मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,वैकुंठास्थान मंदिर,व तापोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा करण्यात आली.तसेच त्यानंतर संत तुकाराम महाराज पादुका पूजन करण्यात आले.व त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख व सर्व मान्यवर व सर्व वारकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हा सोहळा संपन्न झाला.पालखी प्रस्थानानंतर देहूमधील इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी राहणार आहे व उद्या सकाळी देहूमधील इनामदार वाड्यामधून पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.