शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची अवैध वाळू उपसा करणाऱ्या ढंपरवर कारवाई
दोन महिन्यांपूर्वी महसुल च्या धडक कारवाई नंतर वाळु चोरांनी काढले पुन्हा डोके वर तालुक्याच्या पश्चिम भागात रात्रीची वाळु चोरी जोमात.
शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची अवैध वाळु उपसा करणा-या ढंपरवर कारवाई .
शेवगाव चे तहसीलदार छगन वाघ यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवर दोन दिवसांपूर्वी नेवासा रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर कारवाई केली. वाळूने भरलेला ढंपर शेवगाव नेवासा रोडवर जात असल्याची माहिती शेवगाव तहसीलदार यांना समजली. त्यानंतर तहसीलदार यांनी तलाठी, मंडलाधिकारी, यांना घेवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरचा पाठलाग करून त्या वाहनाला नेवासा रोड वरील महावितरण कार्यालयासमोर अडवून सदर चालकाला याबाबत चौकशी केली असता चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वाळु वाहतूक परवाना आढळून न आल्याने ते वाहन शेवगाव तहसीलदार यांनी ताब्यात घेवून सदर वाहनाचा व त्यामधे असलेल्या वाळूचा रीतसर पंचामार्फत पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले.
शेवगाव शहर व तालुक्यमध्ये दररोज रात्री २५ ते ३० ढंपरने वाळु व मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका ढंपर मालकाने दिली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील
वडुले व सामनगाव परिसरामध्ये धडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे
वडुले व सामनगाव परिसरामध्ये अवैध वाळु वाहतूक मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी चालू आहे. त्यावर शेवगाव तहसीलदार यांच्याकडून धडक कारवाई व्हावी अशी मागणी यां भागातील जनतेतून होत आहे. या परिसरात होत असलेल्या वाळु वाहतुकीला महसुल च्या कर्मचारी वर्गातून अभय मिळत असल्याचीही चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांकडून तहसीलदार शेवगांव यांची दिशाभूल करून ही वाळू वाहतूक बनबोभाट केली जात आहे. यावर तहसीलदार यांनी अँक्शन मोड मध्ये येणे आवश्यक आहे. मागे प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे चाळीस वाहनांवर धडक कारवाई केली होती .
महसूल मधील एका कर्मचाऱ्याच्या तालुक्यातील अनेकांना "मामा" बनवनाऱ्याच्या प्रकरणाच्या अनेक तक्रारी महसुल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार होऊनही अर्थपूर्ण संबंध असलेल्या यां कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तो "बागड बिल्ला' कोण?