बार्शीतील पत्रकार गणेश गोडसे यांना ए जे एफ सी राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित
बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बार्शी येथील दैनिक पुढारी चे पत्रकार श्री गणेश गोडसे यांना ए जे एफ सी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने (मलाड) मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात नवीनचंद्र सोष्टे स्मृती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यात पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करण्यास ए जे एफ सी च्या वतीने सन्मानित करण्यात येते. गोडसे यांनी पत्रकारितेमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. संघटनेमध्ये खूप मोठी ताकद असते समाजाला जागृत करण्यासाठी आज अनेक जण काम करत असतात पत्रकार ही 24 तास करण्याची प्रक्रिया आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री पद्मभूषण देशपांडे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक व साहित्य समिती सदस्य प्रा एल बी पाटील, ए जे एफ सी चे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, सचिन बाळकृष्ण कासार, मुंबईचे अध्यक्ष निसार अली सय्यद, कांचन जांबोटी, श्रीधर क्षीरसागर, सत्यवान विचारे, इर्शाद शेख, सचिन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे पुढे म्हणाले की संघटनेसाठी खूप वेळ द्यावा लागतो. पत्रकारितेला काल ही आव्हाने होती आजही आहेत आणि उद्या पण राहणार पत्रकार हे समाजाचे पहारेकरी आहेत समाजातील सर्व घटकांचे प्रश्न व नागरिक म्हणून ही पत्रकार हे असतात. समाजातील कर्ताची भूमिका आहे पत्रकारितेला बजवावी लागतात असे तेे म्हणाले.
अनिल जासकरे यांनी सूत्रसंचालन केले.
यांचा झाला सन्मान:- राहुल कुलट (अकोट) अकोला, अभिमन्यू लोंढे (सावंतवाडी) सिंधुदुर्ग, गणेश गोडसे (बार्शी) सोलापूर, अतुल होनकळसे (कराड) सातारा, युयुत्सु आर्ते (संगमेश्वर) रत्नागिरी, गणेश कोळी (पनवेल) रायगड.
आज पर्यंत गणेश गोडसे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. 1)विजय प्रताप युवा मंच बार्शी तालुका प्राचार्य साहेबराव देशमुख 2012 13,
2)भ्रष्टाचार निर्मुलन जनसंघटना महाराष्ट्र राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार पत्रकार 2015
3)पांगरीत मुलीच्या जन्माचे वाजत गाजत स्वागत या दैनिक पुढारीत प्रकाशित झालेल्या दखल घेऊन ग्रामविकास व महिला बाल विकास खात्याचे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले होते 2015
4)माळशिरस तालुका पत्रकार संघाकडून गौरव 2016
5)राजमाता आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2016
6)अक्कलकोट ग्रामीण पत्रकार च्या वतीने सन्मान 2016
7)कोवीड योद्धा पुरस्कार 2019
8)बार्शी आयकॉन पुरस्कार 2019
9)राज्यस्तरीय दलित मित्र आदर्श पुरस्कार 2021
10)डॉ कुंताताई जगदाळे बार्शी जीवनगौरव पुरस्कार 2022
11)भारत विकास परिषदेचा सेवा पुरस्कार 2022
असे अनेक पुरस्कार प्राप्त केले.
गोडसे यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो.