जिल्हा अधिकारी यांच्यामुळे शेतकऱ्याला न्याय

जिल्हा अधिकारी यांच्यामुळे शेतकऱ्याला न्याय

शेवगाव. मातीचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन तहसीलदारांनी आठ महिन्यापूर्वी वडुले बुद्रुक (ता .शेवगाव) येथील शेतकऱ्यास केलेला 1 लाख 24 हजार रुपयाचा दंड उपोषणाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तत्परतेने लक्ष घालून दंड वसुली स्थगिती दिली.

वडुले बुद्रुक (ता शेवगाव) येथील शेतकरी हरिभाऊ दादासाहेब काळे यांनी जून 2021 मध्ये शेजारच्या शेतकऱ्याचे शेतातील पाणी शेतात व घरात येऊ नये म्हणून स्वतःच्या शेतातील माती उकरून बांधबंदिस्ती साठी मोठे वळण टाकले होते ही बाब निदर्शनास आल्यानंतर शेवगाव च्या तात्कालीन तहसीलदार अर्चना भाकड पागिरे यांनी मातीचे अवैध उत्खननाच्या पक्का ठेवून काळे यांना तब्बल 1 लाख 24 हजार 175 रुपयांचा दंड ठोठावला त्यासंदर्भात दंड भरण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत तीन चार वेळा नोटिसा देखील बजावल्या मात्र याबाबत काळे यांनी वेळोवेळी निवेदन देऊन हे उत्खनन बेकायदेशीर नसून स्वतःच्या शेताच्या व घराच्या संरक्षणासाठी केल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीदेखील हसूल विभागाकडून दाद मिळत नसल्याने त्यांनी अखेर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 मार्च रोजी पासून उपोषणाचा इशारा दिला होता जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आज ( रविवार) सुटीचा दिवस असूनही शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना संपर्क साधून याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर तहसीलदार वाघ यांनी आज रविवार संबंधित शेतकऱ्यांच्या वडुले बुद्रुक येथील शेतामध्ये जाऊन पाहणी केली त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले.

शेतकरी काळे यांचे जिल्हाधिकारी डॉ भोसले यांचे दूरध्वनीद्वार बोलणे करून दिले संबंधित शेतकऱ्याला केलेला दंड रद्द करण्याच्या कारवाईबाबत तहसीलदार वाघ यांना आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्याला झालेला एक लाख चोवीस हजार रुपयांचा दंड तात्पुरता स्थगित करून दिलासा दिला.

अवैध उत्खनन करणारा वर कारवाई करताना गरीब शेतकरी व सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आपण महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत मात्र अनावधानाने कोणावर अन्याय होत असेल त्या संदर्भातील कागदपत्रे पाहून आपण नक्की न्याय मिळवून देऊ. डॉ. राजेंद्र भोसले. जिल्हाधिकारी अहमदनगर