वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून मावळ तालुक्यात राबवले सामाजिक उपक्रम
- प्रतिनिधी-वाढदिवस म्हंटल की तरुणांच्या कडून मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च केला जातो पण यालाच एक अपवाद म्हणजे मावळ तालुक्यातील जांभूळ गावामधील मयूर थोपटे हे आहेत.वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो अनेक जण हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात परंतु अनावश्यक खर्च टाळून तो गरजवंतांना देण्याचा उपक्रम मयूर थोपटे व त्यांच्या मित्रपरिवाराणे राबवला आहे यामध्ये बाळू चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुसवली शाळेत खाऊ वाटप व युवासेना अध्यक्ष राजपुरी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाऊ वाटप व घड्याळ वाटप केले त्याचबरोबर जांभूळ मधील अंगणवाडी शाळेत खाऊ वाटप व शाळेला घड्याळ भेट देण्यात आले तसेच वाढदिवसाच्या दिवशी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान च मार्गदर्शनाखाली किल्ले लोहगडावर गड संवर्धन व स्वछता मोहीम राबविण्यात आली कुने ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थरकुडे याच्या मार्गदर्शनाखाली कुने शाळेत मध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले.असा हा वाढदिवस मावळ तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.