शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा नुसता पीक पाहणीचा दौऱ्याचा अट्टाहास शेतकरी मदतीच्या आशेवर.

शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा नुसता पीक पाहणीचा दौऱ्याचा अट्टाहास शेतकरी मदतीच्या आशेवर.

शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा नुसता पीक पाहणीचा दोऱ्याचा अट्टहास, शेतकरी मदतीच्या आशेवर. 

शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागात ढोरजळगाव, भातकुडगाव, भायगाव बत्तरपूर, गावात नुसता पाहानी दौरा केला तातडीने आणि पैसे बारा महिन्यांनी शेतकऱ्यांना दिलासा कसा काय मिळणार आहे. 

     मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत व शेतकरी संकटात असताना त्याकडे जाणीवपूर्वक नुसती पाहणी करून तालुक्याचे लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

                          मागील काही दिवसापूर्वी वरुर,भगूर,आखेगाव खरडगाव ,वडुले,जोहरापूर,या गावांमधून महापूर आला जनावरे वाहून गेली घरांचे नुकसान झाले शेतकरी उध्वस्त झाला,शेतकरी बांधव मेटाकुटीस आला, तरीही गेल्या दीड दोन वर्षापासून अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.         

        

      तसेच दि. 7 रोजी गारपीट, अतिवृष्टी भातकुडागाव, भायगाव ढोरजळगाव, देवटाकळी इत्यादी गावांमध्ये झालेले कांदा, गहू, पिकाचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणच्या तलाठ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश द्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे करा अशी मागणी सर्व सामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.                            

                                                                       

पीक पाहणीचा फार्स करण्यापेक्षा नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकार दरबारी वेगवान जाहिराती तसेच प्रसिद्धी पेक्षा गतिमान पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या.