बेवारस , मनोरुग्न व रस्तेवर झालेल्या अपघातग्रस्त लोकांसाठी हितेशबंसोड़ ठरला देवदूत !!
1.
बेवारस , मनोरुग्न व रस्तेवर झालेल्या अपघातग्रस्त लोकांसाठी हितेशबंसोड़ ठरला देवदूत !!
प्रतिनिधि-वाहिदशेख(ब्यरो रिपोर्टर)
https.BPSLIVENEWS.IN
सावनेर : जगात अनेक माणसं दुःखीकष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जेरीला आलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीनं रंजीस आलेला असतो, गांजलेला-त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं या मेटाकुटीला आलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे, असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो अशा माणसाला लोक अवलिया पेक्षा कमी नाही समजतात तर देव देखील अशा माणसाच्या ठिकाणीच असतो . एखादा माणूस निराधार, अनाथ असतो. त्याला सांभाळणारा कोणी नसतो. परंतु, जो खराखुरा मानुसकी ज़पनारा असतो, तो त्या निराधार माणसाला आपल्या ह्रदयाशी धरतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात कोणालाच कोणाची पर्वा नाही. स्वतःच्या सर्व त्रास आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल माणुसकी नष्ट होत चाललेली आहे. वाटेत एखादा वेडा किंवा सोडून दिलेला माणूस दिसला तर तो माणूस त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. पण या जगात असे काही लोक आहेत ज्यांना रस्त्यात एखादी निराधार,मनोरुग्न किंवा जखमी व्यक्ती दिसला की, त्याच्या दयेचा सागर त्या बेवारस, वेड्या आणि जखमी व्यक्तीवर दिसतो. होय, आम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत जो रात्र-दिवस कोणत्याही लोभ किंवा नफ्याशिवाय पीडितांना मदत करतो . ज्याला लोक रॉबिनहूड या नावाने संबोधतात. हितेश बनसोड असे त्या व्यक्तिचे नाव आहे.
होय, सावनेरचा हितेश बनसोड, आज हे नाव सावनेर शहरातील प्रत्येक तरुणाच्या जिभेवर आहे. आजच्या आधुनिक युगात ज्या पद्धतीने रस्ते बांधले जात आहेत, त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्यावर कुठेही अपघात झाला तर शासनाने 108 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे, या नंबरवर कॉल केल्यावर कधी हा नंबर व्यस्त असतो तर कधी 108 क्रमांकावरिल वरील वाहन घटनास्थळी पोहोचायला वेळ लागतो.त्यामुळे दुर्घटना व्यक्ति तड़फड़त राहतो किंवा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावे लागतात.मानुसकी ह्या उद्देशाने हितेश बंसोड हा तरुण सावनेर क्षेत्रात अपघात किंवा इतर कोणतीही अनुचित घटना घडल्यास सावनेर पासून 15 किमी च्या अंतरावर माहिती मिळताच हा तरुण प्रथम आपल्या (एम्बुलेंस)रुग्णवाहनाने घटनास्थळी पोहोचतो आणि आपल्या निशुल्क रुग्नवाहिका द्वारे अनेक जखमींना संबंधित शासकीय रुग्णालयात दाखल करुन जीवदान देतो.हितेश बंसोड यांची सामाजिक कार्याची दखल नेहमी शाशकीय व निमशासकिय संस्था (संघटना) व स्थानीय वृत्तपत्र घेत असतात .
हितेश बनसोड आणि त्यांची टीम नेहमीच अशी सामाजिक कामे करत असते, ज्यामुळे सावनेर शहरासह इतर जिल्ह्यात व राज्यातही त्यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.
हितज्योति आधार फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष असून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हितेश आपल्या सामाजिक कार्याला नवी दिशा देत असतो .
रस्त्याच्या कडेला एखादी बेवारस व निराधार किंवा मनोरुग्न व्यक्ती आढळला की तेव्हा हितेश त्याला मदत करण्यास भरपूर प्रयत्न करतो आणि त्या व्यक्तिस स्वतःचे घरी आणून त्याची काळजी घेण्याचा आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न असतो. त्यांच्या ह्या सामाजिक कार्यात त्यांची धर्मपत्नी ज्योती हितेश बनसोड व संपूर्ण कुटुंब देखील ही त्यांना पूर्ण सहकार्य करतात.प्रत्येकाने आपल्या तालुक्यात अपघातग्रस्तांना नक्कीच मदत करायला हवी असं काम केलं तर लोकांचे जीव वाचू शकतो असे आवाह्नन ही हितेशबंसोड यांनी नागरिकांना केले आहे .
माणसाला मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जीवंतपनी मदतीचा हाथ दया , असे हितज्योति आधार फाउंडेशनचे घोषवाक्य आहे .
नुकताच हितेशच्या अश्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राजमाता जिजाऊ फाउंडेशन नागपूर यांच्यातर्फे हितज्योति आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांना उत्कृष्ट समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
29/1/22 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे हा सत्कार कार्यक्रम पर पाडन्यात आले.
ह्या प्रसंगी प्रमुख अतिथी मध्य नागपूरचे आमदार मा. श्री विकास कुंभारे ,पूर्व नागपूर आमदार श्री कृष्णाजी खोपडे ,डॉ.अशोक बागुल सायबर सेल पोलीस निरीक्षक , डॉ. गिरीश चरडे , राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष शरू हरीश निमजे आणि राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते .
आजच्या कलियुगातही हितेश बनसोड सारखी माणुसकी जिवंत ठेवणारी माणसे आहेत, ही सावनेर शहरासाठी मोठी गोष्ट आहे.
हितेसबनसोड यांच्या या कामात महाराष्ट्र शासनाने हस्तक्षेप करून त्यांना अधिकृत मानधन जाहीर करावे जेणे करून त्यांना पैशाअभावी या सामाजिक व मानुसकीचे कार्यासाठी चिंता करावी लागणार नाही.अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
BPS Live News तर्फे हितेश बंसोडच्या ह्या सामाजिक कार्याला सलाम .