बार्शी तालुक्यातील रस्त्यांसाठी 19 कोटी 37 लाख रुपयेचा निधी मंजूर- आ. राजेंद्र राऊत
बि पि एस राष्ट्रीय न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागांसाठी 77 कि.मी.लांब असलेल्या रस्त्यांसाठी 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी वर्ष- 2022-23 या अर्थसंकल्पने तून मंजूर झाला आहे. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितली.
रस्त्याचे पूर्ण काम झाल्यावर तालुक्यातील लोकांना, ग्रामस्थांना कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. चांगल्या प्रकारे दळणवळण होण्यास मदत होईल असेही राऊत यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पनेत वैराग-हिंगणी -मळेगाव -चिखर्डे -गोरमाळे -पांगरी -उक्कडगाव ते जिल्हा हद्द या 9 कि.मी. रस्त्यांच्या सुधारणांसाठी 3 कोटी 80 लाख रुपये.
तर बार्शी- कव्हे- कोरफळे- मालवंडी- मानेगाव या 10.5 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये, बार्शी आगळगाव- काटेगाव- चुंब- कोरेगाव या 20.7 कि.मी. रस्ता सुधारणा साठी 3 कोटी 80 लाख रुपये, गौडगाव ते कात्री या 2.5 कि.मी.रस्ता सुधारणा साठी 1 कोटी 42 लाख रुपये, कासारी ते जिल्हा हद्द या 4 कि.मी. रस्ता सुधारणा साठी 1 कोटी 14 लाख रुपये, श्रीपत पिंपरी ते राज्यमार्ग क्रमांक 145 ला जोडणारा 5.5 किलोमीटर रस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपये, रुई -अंबाबाई वाडी -ज्योतीबाची वाडी या 10 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी 2 कोटी 37 लाख रुपये, तडवळे ते राळेरास या 8 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये, शेंद्री ते उपळाई ठोंगे या 6 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी 95 लाख रुपये.
अशा प्रकारे रस्ता कामकाजासाठी निधी मंजूर झाला असेही आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.