राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात खालच्या पातळीवर चिखल फेक करून वार करणाऱ्या भाजप आमदारांना मार्केट कमिटीच्या मतदारांनी धूळ चारली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात खालच्या पातळीवर चिखल फेक करून वार करणाऱ्या भाजप आमदारांना मार्केट कमिटीच्या मतदारांनी धूळ चारली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात खालच्या पातळीवर चिखलफेक करून वार करणाऱ्यां भाजप आमदारांना मार्केटकमिटीच्या मतदारांनी धूळ चारली........     

         

              आव्हाणे बु :- विधानसभे आधीच शेवगाव तालुक्यामध्ये भाजप आमदाराचा धक्कादायक पराभव सेवा सोसायटी विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे सर्वच्या सर्व ७ उमेदवारांनी सुमारे ४०० मताच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. राहुल शंकरराव बेडके, यांना सर्वाधिक ६३२ मते मिळाली. खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन एकनाथ कसाळ यांना ६३१, अशोक धस ६२९, बाजार समितीचे माजी सभापती अनिल मडके ६२७ तर गणेश खंबरे ६२६, जमीर पटेल ६१९, नानासाहेब मडके यांनी ६१५ मते मिळवून विजय मिळविला. महिला विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाच्या चंद्रकला कातकडे व रागिणी लांडे विजयी झाल्या. कातकडे यांना ६८३, तर लांडे यांना ६८२ मते मिळाली. आदिनाथ शेतकरी मंडळाच्या सुनंदा दिवटे यांना २०७ व रुख्मिणी सुकाने यांना १८६ मते मिळाली. इतर मागास विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे हनुमान पातकळ यांनी आदिनाथ शेतकरी मंडळाच्या सोपान जगधने यांचा ४४३ मताधिक्क्याने पराभव केला. पातकळ यांना ६६४ तर जगधने यांना २२१ मते मिळाली. विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे राजेंद्र दौंड हे विजयी झाले. दौंड यांना ६७९ तर विरोधी भाजप आमदाराचे आदिनाथ शेतकरी मंडळाचे हनुमंत बेळगे यांना १९८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार वसंत गव्हाणे यांना केवळ ५ मतावर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत विभागातील सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे हे ५३७ मते मिळवून तर अशोक मेरड हे ५१५ मते मिळवून विजयी झाले. विरोधी मंडळाच्या संभाजी कातकडे यांना ३०२ तर दिलीप विखे यांना २५१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार शिवाजी भुसारी यांना ९ मते मिळाली. दुर्बल घटक विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाच्या बोधेगावच्या माजी सरपंच प्रीती अंधारे या विजयी झाल्या. त्यांना ५३४ मते मिळाली तर आदिनाथ मंडळाच्या वर्षा पवार यांना २९६ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती विभागातून घोटणचे माजी सरपंच अरुण घाडगे यांनी दणदणीत विजय मिळविला. व्यापारी मतदार संघातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे मनोज तिवारी १५८ मते व जाकीर कुरेशी १५३ मते विजयी झाले. विरोधी मंडळाच्या डॉ.अमोल फडके यांना २८ व खंडू घनवट यांना केवळ २६ मते मिळाली. हमाल मापाडी विभागातून वडुले बु चे विद्यमान सरपंच प्रदीप काळे हे १८९ मते घेवून विजयी झाले. संध्याकाळी ५ वा. मत मोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळी ८ च्या सुमारास सर्व निकाल जाहीर केल्या नंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी उत्साहात विक्रमी सुमारे ९८ टक्के मतदान झाले. त्यामुळे निवडणूक निकाला बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 

बाजारसमितीवर पूर्वी पासूनच घुले बंधूंचे वर्चस्व आहे परंतु भाजपच्या काही जिल्हापरिषद आणि पंचायत समितीचे स्वप्न पडायला लागलेल्या पुढाऱयांनी वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्या बांडगुळाना मतदारांनी सणसणीत चपराक बसवली आहे.