प्रार्थनेच्या नावाखाली महिलेसोबत अश्लील वर्तन, चर्च मध्ये जाण्याचे बंद केल्याने जीवे मारण्याची धमकी.

प्रार्थनेच्या नावाखाली महिलेसोबत अश्लील वर्तन, चर्च मध्ये जाण्याचे बंद केल्याने जीवे मारण्याची धमकी.

ब्रेकिंग न्यूज | शेवगाव | दिनांक – ४ ऑगस्ट २०२५

प्रार्थनेच्या नावाखाली महिलेसोबत अश्लील वर्तन, चर्च मध्ये जाण्याचे बंद केल्याने जीवे मारण्याची धमकी.

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे

शेवगाव तालुक्यातील एका महिलेने ‘आशीर्वाद प्रार्थना भवन होली स्पिरीट जनरेशन चर्च’ येथील कथित उपासक प्रदीप प्रभाकर कोल्हे याच्याविरोधात गंभीर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या मते, तिच्या आजारी पुतण्यावर उपचाराच्या बहाण्याने तिला चर्चमध्ये बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यात आले व धर्मपरिवर्तनाचा दबाव टाकण्यात आला.

फिर्यादी सुनिता अरुण भारस्कर (वय ४६, रा. अशोक नगर, दादेगाव रोठ, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांचा पुतण्या अभय अशोक भारस्कर हा २०१४ पासून आजारी असून त्याच्या बऱ्या होण्याच्या आशेने त्यांनी आपल्या कुटुंबासह चर्चमध्ये जाण्यास सुरुवात केली.

प्रदीप कोल्हे याने उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत, चर्चमध्ये डोळे बंद करण्यास सांगून पीडितेच्या पाठीवर व मानेवर हात फिरवणे, पदर काढणे व हात पकडणे अशी लज्जास्पद कृत्ये केली.

त्याचप्रमाणे, “अजून नातेवाईकांना चर्चमध्ये आणा, नाहीतर उपचार करणार नाही”, असे म्हणत धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा पीडित कुटुंबाने चर्चमध्ये जाणे बंद केले, तेव्हा आरोपी कोल्हे याने शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी धार्मिक श्रद्धेच्या आड येणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला असून आरोपी प्रदीप कोल्हे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.