शेवगाव शहरातील बलदावा व त्यांच्या कुटुंबातील हत्या करणारा मारेकरी जेलबंद
शेवगाव येथील आडत व्यापारी व त्यांची भावजयीचा चोरीच्या उद्देशाने खून करणारा सराईत आरोपी जेलबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ची कारवाई
हकीगत अशी आहे की शुक्रवारी दिनांक 23/ 6 /2023 रोजी पहाटचे 4.00 वाजता सुमारास फिर्यादी श्रीमती सुनिता गोपीकिशन बलवा वय 48. रा . मारोड गल्ली ता. शेवगाव यांचे घरचा वरच्या मजल्यावरील लाकडी दरवाजा अनोळखी इसमाने उघडून आत प्रवेश करून चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पती गोपीकिशन गंगाबिषण बलदावा यांना व जाऊ बाई श्रीमती पुष्पा हरिकिशन बल दावा वय 60 वर्ष अशा दोघांना कशाने तरी डोक्यात मारून जीवे ठार मारले तसेच फिर्यादी यांना लोखंडी कटावणी व विटेने मारहाण व जखमी करून 4.95.000/-हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशनगु.र.नं.552/2023 भादविक 302.397.307.460. प्रमाणे खुणा सहज जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.श्री. बी.जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी घटनेची माहिती घेऊन मा.श्री .राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमणूक सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता आदेश दिले होते.
नमूद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरता तीन वेगवेगळी पथके तयार केली. एका पथकाने शेवगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा माग घेणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पडताळणी करत होते दोन पथके लगतचे बीड पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर परिसरातील संशयित तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे तपास करून गुन्हा उघडकीस अन्याकामी प्रयत्न करत होते.
नमूद सूचनेप्रमाणे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ गणेश वारुळे हेमंत थोरात पोहेकाँ सुनील चव्हाण दत्तात्रय इंगळे अतुल लोटके विजय विटेकर दत्तात्रय गव्हाणे बापूसाहेब फुलाने देवेंद्र शेलार पोणा/ रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे संतोष लोंढे संदीप दरंदले संदीप चव्हाण फुरकान शेखपोको/ रवींद्र घुंगासे अमृत आढाव बाळासाहेब खेडकर जालिंदर माने शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट प्रशांत राठोड संदीप पवार चापोहेकाँ/ संभाजी कोतकर उमाकांत गावडे चापोना/ भरत बुधवंत व चापो को/ अरुण मोरे तसेच शेवगाव पोलीस नेमणुकीचे पोको बाप्पा धाकतोडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत सूचना देऊन पथके रवाना पतके शेवगाव परिसरात फिरून घटना ठिकाणची व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे आरोपीचे वर्णन आरोपीचे चालण्याची पद्धत बॉडी लँग्वेज व त्याने घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पद्धत या आधारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले होते दरम्यान अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हा खेडकर चव्हाण रा बिडकीन ता पैठण जिल्हा संभाजीनगर हा असून तो त्याचे गावी आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोणी श्री दिनेश यांनी तात्काळ प्राप्त माहिती पथकास मिळवून पंचांना सोबत घेऊन तसेच स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित आरोपीचे गावी म्हरोळा बिडकीन ता पैठण येथे पाठवून आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथकाने बिडकीन ता. पैठण येथे जाऊन पोहे काँ वाल्मीक निकम स्यागुशा छत्रपती संभाजी नगर (ग्रा) यांना मदतीस घेऊन संशयित आरोपीची माहिती घेतली असता सदरचा संशयित आरोपी हा म्हारोळा बिडकीन ता.पैठण येथे गावात फिरताना मिळून आला त्याच शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव खेडकर टाबर चव्हाण वय 32 रा म्हारोळा बिडकीन चा पैठण जिल्हा संभाजीनगर असे सांगितले त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने टाटा एस गाडीमध्ये येऊन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
आरोपी नामे खेडकर टाबर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध संभाजीनगर जिल्ह्यात मोक्का खुनासह दरोडा खुनासह जबरी चोरी चोरीच्या उद्देशाने खून करणे चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.