छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणी अखेर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल*

*छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणी अखेर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल*

राहुरी ता प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिवतीर्थावार साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपी. आणि तपासी अधिकारी यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या

औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे अशी घोषणा करण्यात आली आहे

२६ मार्च २०२५ हा दिवस राहुरी तालुक्यासाठी एक काळा दिवस मानला जात आहे. कारण याच दिवशी राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्याची विटंबना झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होऊन एक वर्ष झाले, पोलीस पथकाने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. विटंबना करणाऱ्या आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालय.जिल्हाधिकारी. जिल्हा पोलीस अधीक्षक.,श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डिवायएसपी. तहसीलदार पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असा सज्जड इशारा साहेबराव म्हसे यांनी ६ मार्च रोजी शिवाजयंती च्या दिवशी दिला होता.त्यानंतर १८ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठामध्ये साहेबराव म्हसे यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचे वकील हेमंत ढगे यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असुन या याचिकेमध्ये. गृहमंत्रालयाने आदेश करून तपासात गती निर्माण करावी आणि तपास यंत्रनेत दिरंगाई केलेल्या तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व निपक्षपाती तपास करून योग्य अहवाल सादर करावा अशी मागणी केलेली आहे.यावेळी 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती साहेबराव दादा म्हसे

ऍव्होकेट अथर्व म्हसे. धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंतराव दिघे. धनेश्वर देवस्थानचे सचिव गणेश दिघे. सतीश दिघे. निलेश दिघे. नंदकुमार दिघे. अमोल दिघे.सागर दिघे. सुनील मुसमाडे.शहाजीराव दिघे. राजेंद्र दिघे.

जयराम दिघे. सुनील हिवाळे. अर्जुन म्हसे.आदिनाथ पेरणे. इत्यादींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते..