*बार्शी तालुक्यातील बळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे "बाल आनंद बाजार" उत्साहात साजरा*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

बळेवाडी (ता.बार्शी)        दि.07-01-2023 रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी येथे बाल आनंद बाजार भरविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा उद्घाटन समिती बळीवाडीच्या अध्यक्षा सौ.अश्विनी पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती बळेवाडी चे सदस्य सरपंच लक्ष्मण मोरे, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, प्रियंका रेडके, राजाभाऊ पोकळे तसेच अंगणवाडी सेविका सुचिता मोरे, मदतनीस सगरे सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि माता-पिता तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या आनंद बाजारात बळीवाडी येथे पाटील वस्ती, स्वामी समर्थ मंदिर परिसर अशा विविध ठिकाणाहून बाल मुलांनी येऊन विविध प्रकारच्या वस्तू वडापाव, इडली सांबार, भेळ, पोहे, पॅटीस, समोसे असे खाद्यपदार्थाचे स्टॉल व भाजीपाला तसेच स्टेशनरी स्टॉल लावण्यात आले.

यावेळी आनंद बाजार पाण्यासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थांनी भरपूर प्रमाणात आनंद घेऊन वस्तू व भाजीपाला खरेदी केला. या बाल आनंद बाजारात 5000 रुपयां पेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाली.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कायते सर व श्रीमती मगर मॅडम यांनी परिश्रम घेतले.