आमदार राजळे वरील दगडफेकीचा कासार पिंपळगाव येथे निषेध.मूक मोर्चा काढून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद.

आमदार राजळे वरील दगडफेकीचा कासार पिंपळगाव येथे निषेध.मूक मोर्चा काढून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद.

पाथर्डी. तालुक्यातील शिरसाटवाडी येथे आ . मोनिका राजळे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा कासार पिंपळगाव ग्रामस्थांनी चौकसभा घेऊन जाहीर निषेध केला यावेळी गावात व हद्दीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. 

शेवगाव - पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दि .20रोजी मतदान सुरू असताना भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजळे शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास गेल्या होत्या. मात्र तेथे गेल्यानंतर विरोधी उमेदवारांच्या घोषणा देत मोठा जमाव जमा होऊन आ. मोनिका राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. 

या दगडफेकीत आ. राजाळे यांच्यासोबत असलेले चार जण किरकोळ जखमी झाले.आ. राजाळे यांच्या खांद्यालाही मार लागला या घटनेची माहिती कळताच पाथर्डी तालुक्यासह शेवगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते पाथर्डी जमा झाले होते मात्र या घटनेनंतर आ. राजाळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत परत माघारी जाण्याची सांगितले यामुळे तणावाची परिस्थिती निवळली.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी आ. राजाळे यांचे गाव असलेले कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी सकाळी निषेध सभा घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हा हल्ला आ.राजळे यांच्यावरील नसून लोकशाहीवर असल्याचे सांगत एका महिलेवर भ्याड हल्ला करणाऱ्याचा निषेध केला. यावेळी कासार पिंपळगाव सह वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. 

निषेध सभेनंतर गावातून मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय ग्रामस्थ तरुणासह महिलाही सहभागी झाल्या होत्या.