शेवगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे उत्कृष्ट सहाय्यक मतदार पुरस्काराने सन्मानित

शेवगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे उत्कृष्ट सहाय्यक मतदार पुरस्काराने सन्मानित

शेवगाव कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक शाखेच्या वतीने दिला जाणारा तालुका पातळीवरचा उत्कृष्ट सहाय्यक मतदार अधिकारी पुरस्कार जाहीर होऊन त्यांचे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण करण्यात आले आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी सगळे यांना पत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरित केला आहे राष्ट्रीय मतदार दिवस 2024 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी सोहळा निमित्त  25 जानेवारी रोजी चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित करून उत्कृष्ट काम करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी नायब तहसीलदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे महाविद्यालय यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.