वन-जन-हक्क वजह फाॅउन्डेशन पिपरिया यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन

वन-जन-हक्क वजह फाॅउन्डेशन पिपरिया यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन

नागपुर:-दि. २८ जानेवारी २०२४ रोजी रविवार ला सकाळी ११:०० वाजता उच्च प्राथमिक शाळा पिपरिया येथे गट ग्रामपंचायत पिपरिया व वन-जन-हक्क (वजह) फाॅउन्डेशन (पिपरिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गट ग्रामपंचायत पिपरिया अंतर्गत येणाऱ्या मौजा खापा सिल्लारी वाघोली पिपरिया सालई व फुलझरी गावातील लोकांनी आरोग्य शिबीरात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात लाभ घेतले. 

या शिबिरात स्त्री- रोगतज्ञ,(Gynaecologist), दंत्ततज्ञ (Dental Surgeon), जनरल फिझिसियन,बिपि-सुगर (ACG) अशा विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शिबीरात आलेल्या गरजु लोकांना लाभ मिळाला. यावेळी मा.डाॅ. आशिष कोरेटी (जनरल फिजिसियन)मा.डाॅ.प्रशिल उईके (जनरल फिजिसियन)मा.डाॅ.श्री देवेंद्र मडावी (जनरल फिजिसियन)डाॅ. अमित सहारे (जनरल फिजिसियन)डाॅ. सपना मानकर (जनरल फिजिसियन)डाॅ.हरिश आत्राम (डेंटल सर्जन) डॉ.श्रद्धा सयाम (डेंटल सर्जन) डॉ.सुनिधा उईके (डेंटल सर्जन) डॉ.दयमंती वल्के (Maxillofacial) डॉ.रुतुजा दुंबेरे (स्त्री-रोगतज्ञ Gynaecologist) व Pharmacist's औषध वितरण राहुल कोडवते,निशा उईके.विशाखा मसराम इत्यादी मान्यवर डॉक्टर आरोग्य शिबीरामध्ये सहभागी झाले होते. 

या आरोग्य शिबीराचा यशस्वीतेसाठी प्रा.डाॅ.केशव वाळके (वन-जन-हक्क (वजह) फाॅउन्डेशनचे संस्थापक अध्यक्ष) भारतजी वेट्टी (ग्रामविकास अधिकारी गट ग्रामपंचायत पिपरिया) प्रविणजी उईके (सरपंच गट ग्रामपंचायत पिपरिया) भिमरावजी वाळके (उपसरपंच गट ग्रामपंचायत पिपरिया) सौ.सगिता मर्सकोल्हे (सदस्य गट ग्रामपंचायत पिपरिया)सौ.काजल धुर्वे (सदस्य गट ग्रामपंचायत पिपरिया)कु.आचल कोडापे (सदस्य गट ग्रामपंचायत पिपरिया) संतलाल उईके (सदस्य गट ग्रामपंचायत पिपरिया)सौ.विना उईके (सदस्य)सौ.प्रिती उईके (सदस्य) सुरेशजी मर्सकोल्हे (सामाजिक कार्यकर्ते) कमल उईके (जलसंरक्षक) विजय मडावी (गट ग्रामपंचायत कर्मचारी) दिव्यम वाळके इत्यादी मान्यवर मंडळी यांनी सहकार्य केले.