रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. काळ्या ओढ्याचा रस्ता दगड गोठ्यात हरवला..
बोधेगाव :-तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट नळ्या टाकून उभारण्यात आलेल्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील फरशी (काळा) ओढ्यावरील पुलाच्या रस्त्याची अवस्था बिकट बनली असून वाहनधारकांना दगड-गोटे गुडघाभर खड्डे आणि संरक्षण भिंती विना पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
फरशी ओढ्यावरील पुलाचा प्रश्न अनुत्तरित असताना यासाठी अनेकांनी निवेदन देत पाठपुरावा केला परंतु त्याला यश आले नाही गेल्यावर्षी पावसाळ्यात राज्यमार्गावरील वाहतूक पाण्यामुळे तासन्तास ठप्प होत असल्याकारणाने आणि डॉ. क्षितिज घुले युवा मंचाच्या पाण्यात उतरण्याच्या इशाऱ्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी सिमेंट पाईप टाकून फरशी ओढ्याच्या पाण्याला मोकळीक करून देत रस्ता बनवण्यात आला.
दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी शेवगाव गेवराई हा जवळचा मार्ग वापरला जात असल्याने वाहनांची वर्दळ आणि याच पुलावरून ऊस वाहतूक होत असल्याकारणाने बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या फुलावरील मुरूम आणि दगड-गोटे निघून मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या तच पुलाला संरक्षण भिंत नसल्याने अपघाताची तर मोठा पाऊस झाल्यास पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना देखील सां .बा. विभाग फक्त बघ्याची भूमिका घेणार का ? असा संतप्त सवाल बोधेगाव परिसरातील सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे.
राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव घोरपडे म्हणाले गेल्या वर्षी फरशी ओढ्याला आलेल्या पुरामुळे आठ ते दहा तास पर्यंत पर्यंत वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर ओढा पार करताना वाहने बंद पडणे शेतकऱ्यांचा भाजीपाला पाण्यात पडून नुकसान होणे छोट्या चार चाकी वाहनाचे चेंबर फुटणे अशा अनेक गोष्टींना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागले तात्पुरत्या बनवण्यात आलेल्या मुलाची अवस्था खराब झाली असून मोठा अपघात होण्याअगोदर शासनाने तात्काळ ओढ्यावरील सिमेंट काँक्रेट पुलाचा प्रश्न मार्गी लावावा.
उपविभागीय अभियंता अंकुश पालवे म्हणाले फरशी ओढ्यावरील नवीन पुलाकरता गेल्यावर्षी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला परंतु तालुक्याच्या पूर्व भागात कांबि पुलाला मंजुरी मिळाली.त्यानंतर पुन्हा नव्याने नाबाड कडे प्रस्ताव सादर केला परंतु मंजुरी मिळाली नाही तर संरक्षण भिंतीचे नियोजन पैसा नसल्याने मागे पडले.