अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश !
1.
काटोल :- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफा अडवून केले होते आंदोलन. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार व आमदार अनिलबाबु देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत काटोल येथे एस डी ओ कार्यालयात. झाली प्रशासकीय बैठक. वंचितचे नेते माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केली. घरकुल लाभार्थ्यांना सोमवारपासून पाच ब्रास रेती मिळण्यासाठी रितसर विहित नमुन्यात अर्ज करण्याची सोय करून देण्याची प्रक्रीया सुरू करणार अशी ग्वाही देण्यात आली.
तर तालुक्यातील सर्व शासकीय पान्दन रस्ते खुले करून देण्यावर प्रशासन मंजूरी. दिगांबर डोंगरे यांनी आमदार अनिलबाबु देशमुख यांचे मानले आभार, या बैठकीत आमदार अनिलबाबु देशमुख माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख एस. डी. ओ.शिवराज पडोळे तहसीलदार रणवीर सी.ओ. बोरीकर यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देविदास घायवट शहर अध्यक्ष सुधाकर कावळे पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे, माजी जी प सदस्य शेखर कोल्हे, गणेश चन्ने , विरोधी पक्षनेता संदिप वंजारी, अनुप खराडे. प्रमोद शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.