मौजे निवडूंगे- हुशाई -हातराळ- खडखडी- रस्त्याची दैनि अवस्था नागरिकांना व शाळेतील मुलांना जीव मुठीत धरून दळणवळण करावे लागते.
ता. पाथर्डी-मौजे निवडूंगे - हुशाई रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच डांबरीकरण काम पूर्ण झाले. पण या रस्त्याला साईड पट्टी नाहीत. तसेच रस्त्यालगत असलेले शेतकरी यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून नागरिकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो अपघाताला सामोरे जावे लागते.
तसेच हुशाई - खडखडी - हातराळ -या रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता दुरुस्त करण्यात यावा त्यामुळे नागरिकांना - शाळेतील मुलांना जीव मुठीत धरून दळणवळण करावे लागते. जागोजागी खड्डे. दुतर्फा असलेल्या काट्या. रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण. डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण रस्त्याला नसलेल्या साईड पट्ट्या. त्यामुळे नागरिक व शाळेतील मुलांना कसरतीचे जीवन जगावे लागत आहे.
तसेच हा रस्ता पैठण ते मढी कावडीचा आहे या रस्त्याला नेहमी वर्दळ असते त्यामुळे जास्त अपघात होतात .
तसेच सदर रस्त्याची ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयाला अर्ज देऊन सुद्धा वेळोवेळी दुरुस्तीबाबत पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या वस्त्या वाड्यावरती आरोग्याचा प्रश्न. अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्यामुळे नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन निवेदनामध्ये दि.२. ऑगस्ट 2022 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर दि.३. ऑगस्ट 2022 रोजी ठीक सकाळी १०. वा. ग्रामपंचायत कार्यालय निवडूंगे येथे उपोषणास बसणार आहेत .