संजय गांधी व श्रावण बाळ योजना प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा :-विकास गटकळ
*संजय गांधी व श्रावण बाळ योजना प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा विकास गटकळ*
शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर
शेवगाव तालुक्यामधील संजय गांधी श्रावण बाळ योजना ह्या योजनेमध्ये सर्व दुर्बल घटक असून विधवा अपंग निराधार व इतर शेवगाव तालुक्यामधील खेड्यापाड्यातून लोक तहसील मध्ये येत असतात तिथे तहसील पुढे त्यांची लुटमार होत आहे कोणत्याही प्रकारचे काम होत नाही काही व्यक्तींचे चार पाच वेळा प्रकरण देऊनही प्रकरण मार्गी लागत नसल्याने दिव्यांग विधवा वृद्ध हे वंचित घटक असल्याने यांना न्याय मिळत नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आहे दिव्यांगांना विधवांना वृद्धांना त्यांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे एक-दोन दिवस तहसील मध्ये आमचे शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही तुम्हाला मदत करू लागतील पण हे काम मार्गी लागल्याशिवाय शिवसंग्राम पक्ष गप्प बसणार नाही येत्या
दी.11/8/2022 तारखेपर्यंत याच्यावर एक मोठी बैठक घेऊन हे प्रकरण मार्गी लावावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे. जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे. तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे. शहराध्यक्ष अशोक कुसळकर. मीडिया प्रमुख विकास गटकळ.राम नागरे.
अन्यथा येत्या दी/19/8/2022 रोजी तुमच्या तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल