आदासा कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला आणि वारसांना नोकऱ्या दिवाळी पूर्वी द्या .*  भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळेचा निकालीचा इशारा.

*आदासा कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला आणि वारसांना नोकऱ्या दिवाळी पूर्वी द्या .* 
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळेचा निकालीचा इशारा.
 बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज दिल्ली                               सावनेर:- दि 28 : वेस्टर्न कोल फिल्ड (वेकोली ) उपक्षेत्र सावनेर च्या आदासा युजी 1 आणि 2 कोळसा खान अंतर्गत कोटोडी एरणगाव पंधराखेडी आणि फटकाखेडी या चारही गावच्या कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या 321. 13 हेक्टर अधिकृत शेत जमिनीचा मोबदला आणि वारसांना नोकरी दिवाळीपूर्वी द्या  अशा आग्रह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला .

सावनेर क्षेत्रातील आदासा खानग्रस्त शेतकऱ्यांच्या वीविध समस्या निवारण तथा अधिकृत जमिनी बाबत तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर कार्यालयात 26 सप्टेंबर 2022 सोमवारी दुपारी एक वाजता आयोजित बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्या समक्ष शेतकऱ्यांची बाजू मांडली.
सावनेर उपक्षेत्रातील आदासा युजी 1 आणि 2 कोळसा खान अंतर्गत कोटोडी एरणगाव पंधराखेडी आणि पटकाखेडी या 4 गावातील शेती वेकोलीने अधिग्रहित केली यावर खोद काम करून उत्पादनही सुरू केले तथा क्षुल्लक क्षुल्लक कारणाहून शेतकऱ्याना त्रस्त करीत आहे यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी कमालीचे हैराण (अस्वस्थ )आहेत त्यांचा कोणी वाली नाही यामुळेच 3 शेतकऱ्यांचे जीव गेले  तरीही संबंधित प्रशासन अधिकारी आणि वेकोली अधिकाऱ्याची मनमानी सुरूच आहे त्यांच्या कुटुंबियांची दयनीय अवस्था झाली  यातून विपरीत घटना घडल्यास संबंधीत दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे यांनी केली आहे. सदर प्रकरण गंभीर असून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदारी यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कारवाहीचे  निर्देश दिले .  
यावेळी विभागीय आयुक्त सोबत संपूर्ण संबंधित विभागीय अधिकारी व नेतागण उपस्थित होते .