चिखलीत टायर चे दुकान फोडून साठ हजार रुपयाची धाडसी चोरी

पुणे प्रतिनिधी -हवेली तालुक्यातील चिखली गावामध्ये टायर चे दुकान फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यानी अभंग टायर चे दुकान फोडून रोख रकमेची चोरी केली. गुरुवारी पहाटे पाच च्या सुमाराम अज्ञात चोरट्यानी दुकानाचे शटर फोडून ही चोरी केली.सकाळी दुकानाचे मालक यांनी दुकान पहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे व्यापार्‍यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिखली येथे अभंग टायर नावाचे दुकान आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक हे दुकान बंद करून घरी निघून गेले होते.गुरुवारी पहाटे तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटर चा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील रोख रक्कम साठ हजार चोरून पसार झाले.चोरट्यांनी टायर चे दुकान फोडून केलेल्या या चोरीमुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.