शेवगाव तहसील कार्यालय आवारात घाणीचे साम्राज्य पसरले.

शेवगाव तहसील कार्यालय आवारात घाणीचे साम्राज्य पसरले.

*शेवगाव तहसील कार्यालय आवारात घाणीचे साम्राज्य पसरलेले

शेवगाव प्रतिनिधी. :- यशवंत पाटेकर

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. शेवगाव तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी व चाळीस किलो मीटर टोकावरून महसूल प्रशासनाचे काम करण्यासाठी नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात येत असतात. शेवगाव तहसील कार्यालयामध्ये येत असतात. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोक ताणलेले असतात. येथील कार्यालयांमध्ये कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. तिथे तुंबलेले आहेत. पाणी पिण्यासाठी कामानिमित्त येणार्‍यांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सामान्य नागरिक सह महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. पान खाऊन रंगवलेल्या भिंती. काही ठिकाणी मोडक्या खुर्च्या धूळखात पडलेले आहे. रिकाम्या पाण्याच्या बॉटल कार्यालयामध्ये पडलेले आहे. काही स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती अनेक महिन्यापासून असेच वातावरणात कार्यालयाचा कारभार चालू आहे. महिला व पुरुष स्वच्छतागृह आहे नियमित स्वच्छता नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नाही सर्वत्र घाण आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांची कुचंबना होत आहे. पिण्याची पाण्याची सोय करावी स्वच्छतागृहांमध्ये साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. एकीकडे शासनामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येतात स्वच्छताची जनजागृती करण्यात येते. शासनाच्या कार्यालयात अस्वच्छता ने कळस गाठला आहे. स्वच्छता गृहातून येणारी असाय दुर्गंधी कर्मचारी वर्ग कामानिमित्त येणारे नागरिक बिंदास पान खात कोपरे व भिँती रंगवण्याचे काम सुरू असते. कार्यालयातील कर्मचारी व काही अधिकारी वर्गांना स्वच्छता चे धडे द्यायला पाहिजे अशी मागणी होत आहे..