विद्युत उपकेंद्र टाळे. अकरा लाख रुपयांचा कर थकीत मालमत्ता जप्त करणार
महापारेषणच्या अमरापूर ( ता. शेवगाव) येथील 220 केव्ही उपकेंद्रास ग्रामपंचायतीने 11 लाख 46 हजार 531 रुपयाच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी टाळे ठोकले आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुजित भोग. सरपंच संगीता पोटफोडे .उपसरपंच शारदा बोरुडे. ग्रामसेवक अशोक नवले .यांनी ही कारवाई केली. चार दिवसांत कर न भरल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने महापारेषणची येथील मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहे. महापारेषांच्या बाभळेश्वर येथील अतिउच्च दाब संचालन व सुव्यवस्था विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास याप्रकरणी ग्रामपंचायतीने नोटीस दिली आहे अमरापूर येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या 220 केव्ही उपकेंद्राकडे मे अखेर मागील 7 लाख 57 हजार 35 रुपये व चालू बाकी 3 लाख 89 हजार 496 रुपये अशी एकूण 11 लाख 46 हजार 531 रुपये थकबाकी आहे रकमेच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने तीन वेळा रजिस्टर पोस्ट आणि व कार्यालयाच्या मेलवर पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यानंतरही आपल्या कार्यालयाकडून कोणतीही निर्णय न घेतल्याने बिलाच्या मुदतीच्या अनुषंगाने पंधरा दिवसाचा विचार न करता टाळाटाळ करत असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आपल्या कार्यालयामार्फत लेखी खुलासा ग्रामपंचायतीस सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कुठलीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी ( ता.24 रोजी) सरपंच पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली .यावेळी माजी सरपंच विजय पोटफोडे. सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोटफोडे .उपाध्यक्ष अजित पठाण .ग्रामपंचायत सदस्य महादेव खैरे. शुभम पोटफोडे. आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकाऱ्यांनी महापारेषण वसुलीचे पत्र मिळाल्यानंतर अपील करण्यासाठी तीस दिवसाची मुदत दिली होती मात्र ग्रामपंचायतीने मुदतीपूर्वी दोन दिवस अगोदर ही कारवाई केली. याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उज्वल पाटील :- प्रभारी कार्यकारी अभियंता महापारेषण बाभळेश्वर