पवार साहेब माझ्या मुलीला वाचवा-बापाची अंतःकरणातुन हाक*

बी पी एस लाईव्ह न्यूज,

जिल्हा प्रतिनिधी-सम्मेद तरटे.

बार्शी- (ता.बार्शी).  शहरातील उपळाई रोड येथील राहणारे शेतकरी कुटुंब येथील एकुलती एक मुलगी कल्याणी काकासाहेब काळे (वय 19).

पवार साहेब....युक्रेन - खारकिव्ह मध्ये चालू असलेल्या भयानक युद्धात माझी मुलगी अडकली असून तुमच्या मुलीसारखी माझी पण एकुलती एक मुलगी आहे. माझं शरीर जरी असलं तरी माझा प्राण, जीव तिच्यात आहे माझ्या मूलीला वाचवा.

अशी अंतकरणातून हाक काकासाहेब काळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांना बोलून दाखवली. सुमारे एक तासाच्या जवळपास त्यांनी पवार साहेब यांच्याशी चर्चा केली.

श्री पवार साहेब यांनी भारत सरकारच्या यंत्रणेशी चर्चा केली याची माहिती मिळताच काळे यांच्या जीवात जीव आला.

युक्रेनमध्ये खारकिव्ह शहरात युद्ध होत असताना निम्म्यापेक्षा जास्त शहरात क्षेपणास्त्राचा हल्ला होत असताना माझी मुलगी वापस ही येईल की नाही याची चिंताजनक खंत वाटत होती तेव्हा काळे यांनी बारामती येथे जाऊन तिथे पवार साहेबांना पूर्ण व्यथा सांगितली आणि पवार साहेबांनी तात्काळ याची दखल घेतली.

मला रस्त्याच्या बाहेर पडता येत नाही कारण सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. आणि वरून क्षेपणास्त्रचा बॉम्ब हल्ले होत आहेत. आणि माझा जीव मुठीत धरून मी बसले आहे. मी भारतात परत येऊ शकेल की नाही असे कल्याणी काळे हिने पवार साहेबांना सांगितले.

पवार साहेबा बरोबर एक तास चर्चा केल्यानंतर साहेबांनी मुलीला परत आणण्याचे आश्वासन दिले आणि बुधवारी मुलीच्या पालकांना फोन आला आणि काळे यांच्या जीवात जीव आला.

मुलीने परत येतानाचा व्हिडिओ पाठवला सोबत 17 भारतीय विद्यार्थी आहेत. आम्ही सर्व बॉर्डरवर सुखरूप पोहोचलो आहोत आणि लवकरच भारतात येऊ असे तिने आपल्या वडिलांना सांगितले.