शाळेत विद्यार्थ्यांना शिकवितांना ह्दविकाराचा झटका आला अन् शिक्षकाचा प्राण गेला..
BPS LIVE NEWS NETWORK, DELHI
काटोल तालुका प्रतिनिधी- मयुर बी.कुमरे
शाळेत विद्यार्थ्यांना शिकवितांना ह्दविकाराचा झटका आला अन् शिक्षकाचा प्राण गेला..
काटोल - स्थानिक कडू ले- आऊट, पंचवटी येथील रहिवासी शिक्षक धनराज यादवराव डंगारे (वय ५६) यांचे आज दुपारी १२ वाजता च्या दरम्यान ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले,
उमठा येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात शिकवीत असतांना ते जमीनीवर अचानक कोसळून पडले. शाळेतील इतर शिक्षकांनी व गावकऱ्यांनी त्यांना डाॅक्टरांकडे नेले परंतू तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.
त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ व मुले असा बराच मोठा आप्तपरीवार आहेे. शांत, संयमी व मृदू स्वभावाच्या शिक्षकाच्या जाण्याने संपूर्ण काटोल-नरखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.