*बेकायदेशीर सावकारकी चे वाढते प्रमाण; फसतायेत तरुणवर्ग व शेतकरीवर्ग*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

सध्या बेकायदेशीर सावकारकीचे प्रमाण अति प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये गरीब जनता व शेतकरी वर्ग होरपळून जात आहेत. एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात नड पडली तर महिनेवारी- दहा टक्के, पंधरा टक्के, वीस टक्के अशा प्रमाणामध्ये अतिरेक व्याज घेतले जाते. अशा बेकायदेशीर सावकारकीपणा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत.

अशांवर पंधरा वर्षांपर्यंत कधीही गुन्हा दाखल करता येतो. बेकायदेशीर सावकारकीपणा करणाऱ्या किंवा बेकादेशीर लेन धेन आढळल्यास अधिकतम कलम 39 नुसार पाच वर्षाचा कारावास व पन्नास हजार रुपये दंड आहे.

महाराष्ट्र सरकारी अधिनियम 2014 च्या कलम 18 च्या अंतर्गत सावकारकेच्या ताब्यातील जमीन कर्जदाराला परत करण्याचे अधिकार निबंधकाला आहेत. कलम 16-17 च्या अंतर्गत जिल्हा उपनिबंधक यांना संबंधित व्यक्तीच्या तक्रारीनुसार झडती घेऊ शकतात वसुलीसाठी समोरच्या व्यक्तीस जबरदस्ती करता येत नाही. जी व्यक्ती उपद्रव देईल किंवा उपद्रव देण्यास इतरांना भीती देऊन दमदाटी करेल किंवा कर्जदाराच्या मालमत्तेत ढवळाढवळी करेल व कसल्याही प्रकारची घरात घुसून जबरदस्ती करेल अशा व्यक्तींना दोन वर्षाच्या कारावास व दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. ज्यांचे सावकारकेच्या नियमांच्या नुसार लायसन्स असेल त्यांना पण बँकेच्या नियमाप्रमाणेच वसुली करता येईल दिलेली मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही सावकारी कायद्यातील कलम 31 नुसार राज्यातील निश्चित केलेल्या व्याजानुसारच व्यवहार करता येईल जे लोक बेकायदेशीर टक्केवारी घेऊन सावकारकी पणा की करतात अशा लोकांनी दहा टक्के, वीस टक्के अशाप्रकारे व्याज मागत असल्यामुळे बरेच कुटुंब आपले गाव सोडून गेले आहेत. जरी अशा तक्रारी असतील तर त्यांनी पोलिसांकडून मदत घ्यावी व जिल्हा निबंधक कार्यालयात जाऊन तक्रारी द्याव्यात.