*वैराग येथे दि.24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान जैन धर्मीय "पंचकल्याणक मोहोत्सव" सुरू*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
वैराग-(ता.बार्शी) वैराग येथे दि.24 ते 28 नोव्हेंबर पर्यंत भव्यातीभव्य जैन धर्मीय "पंचकल्याणक महोत्सव" सुरू.
हा महोत्सव विद्यामंदिर संस्थेच्या प्रांगणात श्री आदिनाथ भगवान पंचकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा महोत्सव 17 वर्षांपूर्वी झाला होता त्यानंतर आत्ताच या महोत्सव सुरुवात असल्यामुळे वैराग यामधील सर्व जैन समाजातील श्रावक श्राविकामध्ये अतिशय हर्ष उल्हासचे वातावरण निर्माण झाली आहे. हा महोत्सव जैन धर्मियांचे महाराज मुनी,माताजी यांच्या सानिध्यात होत असतो.
या महोत्सवाचे विशेष महत्त्व असे की भगवान तीर्थंकरांच्या गर्भधारणेपासून ते मोक्षा पर्यंत जाणाऱ्या सर्व विधिविधानाचा यामध्ये भव्य देखावा केला जातो. जैन धर्मात सर्व उत्सवामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणून हा उत्सव संबोधला जातो.
या पंचकल्यानांमध्ये पहिले गर्भ कल्याणक, दुसरे जन्मकल्याणक ,तिसरे तप कल्याणक, चौथे ज्ञान कल्याणक, तसेच पाचवे मोक्ष कल्याणक त्याचा समावेश केला आहे. या उत्सवा दरम्यान विविध प्रकारची पूजा, अर्चना, आरती मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच मंदिरामध्ये नवीन मूर्तीची स्थापना केली जाते. या उत्सवात वैराग मध्ये 400 ते 500 किलो ची पंचधातूची मूर्ती बसवण्यात येणार आहे. श्रमनाचार्य 108 श्री सुंदरसागरजी महाराजांचे अज्ञानूवरती शिष्य आचार्य 108 श्री सुयशसागर जी महाराज यांचे आशीर्वाद लाभले असून श्री 105 आर्यीका शुद्होहंश्री माताजी, श्री 105 आर्यीका सांवितीश्री माताजी आणी क्षुल्लक सूनम्रसागर जी यांच्या सानिध्यात हा पंचकल्याणक महोत्सव होणार आहे.
या महोत्सवामध्ये सौधर्मे इंद्र श्री आनंदलाल गांधी तर शची देवी मंगला गांधी यांचे असून तर श्री भगवंताचे माता-पिता शकुंतला आणि राजकुमार दोभाडा, कुबेरपद अंजली गांधी, महा-यज्ञनायक सारंगा आणि राजेंद्र येवणकर यांनी सुशोभित केले आहे. या महोत्सवाचे चंद्रकांत पंडित, आनंद उपाध्ये हे पंडित आमंत्रित आहेत.
तरी सर्व वैराग जैन समाजाच्या वतीने भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.