शेवगाव पोलिसांनी तलाठ्यासह चौघांना जुगार खेळताना पकडले
शेवगाव येथील सूर्या लॉजवर विनापरवाना तिरट नावाचा हार गीतेचा जुगार खेळताना एका तलाठ्यास चौघाप्रतिष्ठांना ताब्यात घेतले. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली पोलिसांनी या जुगाराकडून जुगारीच्या साहित्यासह सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार करणाऱ्यांमध्ये सोपान जनार्दन थोरात ( वय 37 )अंकुश रमेश पाठक व (वय 33) गणेश भिमराज निकम (वय 37 ) गणेश गोरख वावरे (वय 33) सर्व राहणार शेवगाव जिल्हा अहमदनगर यांचा समावेश आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की शेवगाव शहरातील नेवासा रोड लगत असलेल्या सूर्या लॉज येथे काही इसम तिरट नावाचा हार जिथे चा जुगार खेळत असल्याची माहिती शेवगावचे पोनि. विलास पुजारी यांना समजली त्यांनी सपोनी रवींद्र बागुल यांना पथका सह संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. यानंतर या ठिकाणी छापा टाकला असता वरील चौघेजण जतरट नावाचा हर्जित जुगार खेळताना आढळून आले. या चौघांना जुगाराचे साहित्य व सहा हजार चारशे रुपयांच्या मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोकाॅ. वासुदेव ठकाजी डमाळे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम (12) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जगामध्ये एका तलाठ्याचा समावेश असल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.