*नेताजी सुभाषचंद्र बोस बार्शी न.पा.(क्र.१६) या शाळेस पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी व सावित्रीबाई फुले युनिट गाईड्स यांच्या वतीने भेट वस्तू*

*नेताजी सुभाषचंद्र बोस बार्शी न.पा.(क्र.१६) या शाळेस पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी व सावित्रीबाई फुले युनिट गाईड्स यांच्या वतीने भेट वस्तू*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी-   दि.06-09-2022     रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस सर यांच्या मार्गदर्शनाखाली, नेताजी सुभाष चंद्र बोस न.पा. क्रमांक 16 या शाळेला पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी व सावित्रीबाई फुले युनिट गाईड्स यांच्या वतीने एक ढोल व टू साईट बोर्ड देण्यात आला. तसेच बाल विद्यार्थ्यांसाठी खाऊ स्वरूपात बिस्कीटच्या पुड्याचे वाटप करण्यात आले.

या शाळेचे सर्व शिक्षक- शिक्षिका वृंद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मुलांना शिकवत असतात. त्यांच्या शिक्षणाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर अतिशय चांगल्या प्रमाणे पडत असतो. तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्व क्षेत्रात अग्रेसर असतात. तसेच त्यांच्या कलेच्या माध्यमातून या शाळेचे वेगवेगळे उपक्रम होत असतात.

या कार्यक्रमा वेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, सदस्य- दत्ता माने, कासारवाडी उपाध्यक्ष- अमोल चौधरी तसेच महिला बार्शी तालुका अध्यक्ष- सुप्रिया काशीद, शहर उपाध्यक्ष- कौशल्य राऊत, शहर संपर्कप्रमुख- मनीषा साळुंखे,

भैरवनाथ शाळेचे शिक्षक अखंडेकर सर, शेख सर व नगर पालिका क्रमांक 16 नंबर शाळेचे मुख्याध्यापिका सुशीला जाडकर, शिक्षिका जास्मिन शेख, शोभा आगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष क्षीरसागर सर इत्यादी पदाधिकारी व शिक्षक-शिक्षिका वृंद तसेच बाल विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.