सावनेर येथे व्हॉईस ऑफ मीडियाची नवीन कार्यकारिणी डिजिटल/दैनिक विंग पत्रकार स्नेहमिलान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले.

सावनेर येथे व्हॉईस ऑफ मीडियाची नवीन कार्यकारिणी डिजिटल/दैनिक विंग पत्रकार स्नेहमिलान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले.

(प्रतिनिधी - वाहिद शेख)

सावनेर :( दि.20 फेब्रुवारी) आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे.त्यामुळे पत्रकारितेला चौथास्तंभ ही उपमा दिली आहे.जागतीक हालचाली, कळत-नकळत घटना,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण हालचाली किंवा माहिती 139 कोटी जनतेपर्यंत पोहचवीण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते.

सकारात्मक पत्रकारिता हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच समाजाचे कल्याण होते, हा विचार आपोआपच लोकांमध्ये रुजेल. आपल्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी होईल. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकारिता शाबूत राहावी, पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा, पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हावा, तसेच पत्रकारांना एकजूट होण्याकरिता व पत्रकारांचा समस्स्या सोडविण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी शनिवारला दुपारी 1 वाजता सावनेर शहर स्थित प्रसिध्द कामाक्षी सेलिब्रेशन हॉल मधे व्हॉईस ऑफ मीडियाची नवीन कार्यकारिणी डिजिटल/दैनिक विंग पत्रकार स्नेहमिलान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संपत खलाटे उपविभागीय अधिकारी सावनेर , उत्तम भाऊ कापसे (शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख), प्रा.बाबा टेकाडे (वरिष्ठ पत्रकार सावनेर) ,राजेश सोनटक्के (व्हॉईस ऑफ मीडिया - विदर्भ कार्यकारिणी ), विजय ठाकूर (पीटीआय न्युज), देवनाथ गंडाटे (डिजिटल मीडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष) , गयाप्रसाद सोनी (मप्र.मीडिया प्रमुख) , अशोक सोनी( पांढूर्णा मीडिया संघ प्रमुख) , कुंजबिहारी शर्मा ( समाचार नेशन न्यूज ब्यूरो चीफ), इत्यादी मान्यवरांना पुष्पगुच्छ व पुरस्कार देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले . तसेच मान्यवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून डिजिटल मिडीयाबाबत आप-आपले मनोगत व्यक्त करून आपली उपस्थिती प्रामुख्याने दर्शवली .

 प्रत्येकबाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केल्या जाते.पत्रकारितेचे अनेक तत्व आहेत लिखाण, समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने व ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत, सरकारपर्यंत  व प्रशासनापर्यंत पोहचवीने.

आजच्या आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन,वेब-पत्रकारिता, सोशल मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जाते.परंतु काही वाहीण्या स्वत:च्या स्वार्थासाठी कार्य करतात. यामुळे पत्रकारितेची बदनामी होतांना सुध्दा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.परंतु पत्रकारिता तीच असते ज्यामुळे समाजाची जडणघडण मजबूत होत. पत्रकारिता व चौथास्तंभ याला कोणताही आघात पोहचनार नाही याची जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारने घेतली पाहिजे.टिआरपी वाढावी म्हणुन काही वाहीण्यांनी पत्रकारीतेची व चौथास्तंभ याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सरकारने हाणुन पाडला.

 पत्रकारिता व चौथास्तंभ याला कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाही याची काळजी सर्वांनीच  घेण्याची गरज आहे. देशात कुठल्याही परिस्थितीत पत्रकारितेचे व्यवसायीकरण होवु नये व राजकीय दृष्ट्या कोसो दूर राहुन पत्रकारिता आणखी बळकट केली पाहिजे. कारण पत्रकारिता ही प्रसारमाध्यमांचे काम करीत असते यातुनच समाजाला दीशा निर्देश मिळत असते.पत्रकारिता ही वटवृक्षासारखी अफाट आहे कारण समाजातील घटना उन, पाउस, थंडी यासारख्या बदलत असतात यापासून संरक्षण करण्याचे काम पत्रकारिता नेहमी करीत असते.

पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता आकाश-पाताळ एक करून निर्भीडपणे कार्य करीत असतो.परंतु गेल्या काही वर्षांपासून असामाजिक तत्वांकडुन पत्रकारांवर हल्ले होत असतांनाचे दिसून येते ही अत्यंत गंभीर व निषेधजनक बाब आहे. याकरिता राज्यात पत्रकार संरक्षण कायदा प्रभावीपणे लागू करावे , पत्रकारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा , विमा , मुलांचे शिक्षणात मदद आणि पत्रकारांना शासनातर्फे वृद्धकाळात मानधन देण्यात यावे असे मार्गदर्शन मान्यवरांनी याप्रसंगी आपल्या भाषणात केलं .

आज डिजिटल मिडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी सर्वांना पहायला मिळते.या घडामोडी समाजापर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी होत असते. तसेच आपल्या पत्रकारितेची विचारधारा आहे, मार्गदर्शक तत्त्व आहे. सदर कार्यक्रमात सावनेर , पाटणसावंगी , छिंडवाडा, पांढूर्णा, नागपूर , भिवापूर , रामटेक , कळमेश्वर, कुही , कामठी , मांढल, काटोल , हिंगणा , नरखेड , परशिवणी, मौदा इत्यादी क्षेत्राचे डिजिटल व प्रिंट मीडियातील असंख्य पत्रकार उपस्थित होते .

डिजिटल/दैनिक विंग पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रमाचे संचालन वेदश्री देशपांडे यांनी व आभार प्रदर्शन संजयजी टेंभेकर यांनी मानले .

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे डिजिटल/दैनिक विंगचे पत्रकार दिलीप घोरमारे (अध्यक्ष) , वाहिद शेख ( उपाध्यक्ष), राहुल सावजी (कार्याध्यक्ष) , तुषार गायकवाड (उपाध्यक्ष) , कैलाश शर्मा (सर चिटणीस), संतोष धानोरकर (कोषाध्यक्ष) , नितेश गव्हाणे , जितेंद्र कोल्हे , अनुप पठाने , चंदू मडावी , गिरीश आंदे, दिनेश चौरसिया , रविना शामकुळे, पूजा जांगडे आदिने मोलाचे कार्य केले असून प्रशांत ठाकरे , आनंद श्रीवास्तव , पियूष झिंजुवाडीया , अनंता पडळ , विनूू वाघमारे आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ता यांनीही आपली उपस्थिती दर्शविली व पुढील वाटचाली करिता शुभेच्छाही दिल्या .