शेवगावात चार लाखाचे लाकूड जप्त. वन विभागाची दोन ठिकाणी कारवाई.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील लाकडाच्या गिरणी विरुद्ध वन विभागाने धडक कारवाई करीत. शेवगाव येथे उमेश अर्जुन घुले यांचे तीन लाख रुपयाचे लाकूड चिरण्याची मशीन व 98 घनमीटर,( लाकूड किंमत चार लाख रुपये) जप्त करण्यात आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील केशव चांगुने यांच्याकडील कापलेले लाकूड जप्त करून त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाच्या पाथर्डी कार्यालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने .वनरक्षक जयराम गोंदके. यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अवैध वृक्षतोड व अवैध आरा गिरण्या चालकाविरुद्ध तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे व सहकाऱ्यांनी मोहीम उघडली आहे. पंधरा दिवसापूर्वी तोडलेले रुक्ष वाहून नेणाऱ्या सात ट्रक वन विभागाने पकडल्या होत्या. त्यानंतर दोन्ही तालुक्यात अवैध आराग गिरण्या बंद करण्याचे आवाहन अरुण साबळे यांनी केले होते. अनेकांनी गिरण्या बंद केले आहेत परंतु अवैध रीत्या सुरु असलेल्या आरा गिरण्या वर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
लाकूड वाहतुकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष -लाकूड वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरली जातात ती वाहणे मुदत संपलेली वाहने आहेत शेवगाव मध्ये अनेक वेळा आरटीओ कॅम्प होऊनही त्यांच्या हे निदर्शनात कसे येत नाही एक प्रकारे आरटीओ विभागाकडून अवैध धंद्याला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच जे जागामालक हा अवैध व्यवसाय चालवण्यासाठी आपली जागा भाड्याने देतात त्यांच्यावर वन विभाग कारवाई करणार का याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ज्या ठिकाणी अवैध चालवल्या जातात त्या ठिकाणी महावितरण थ्री फेज कनेक्शन कसे देते व कोणत्या आधारावर देते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.