शासकीय योजनेची जत्रा

शासकीय योजनेची जत्रा

*शासकीय योजनेची जत्रा*

शेवगाव तालुका प्रतिनिधी :- श्री यशवंत पाटेकर

शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सरकारी लाभाच्या योजना आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात वेळापत्रकानुसार आपल्याच गावात शासकीय अधिकारी येणार आहेत त्या दिवशी आपल्या तहसीलदार वाघ साहेब. गुरव साहेब. दिवाण साहेब. गटविकास अधिकारी साहेब तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक सर्व तालुक्यातील सेवा केंद्र आधार केंद्र चालक व सर्व कर्मचारी वर्ग या सहभागी आहेत.

अनुदानित योजना त्याचबरोबर शासकीय दाखले शालेय दाखले उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड दुरुस्ती नवीन रेशन कार्ड अन्नसुरक्षा योजना अंत्योदय योजना संजय गांधी निराधार योजना कुक्कुटपालन शेळीपालन गाय गोठा त्यात बरोबर कृषी योजना मागील त्याला शेततळे फळबाग योजना ट्रॅक्टरची अवजारे आरोग्य योजना रस्ते व पाणी विषयीच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी अधिकारी वर्ग आपले ग्रामपंचायत मध्ये येणार आहेत सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावात लाभ घेण्यासाठी उपस्थित राहून आपल्या अडचणी समजावून सांगून त्यामध्ये घरकुल योजना शबरी योजना रमाबाई घरकुल योजना अशा विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापल्या गावच्या वेळापत्रकानुसार हजर राहून अर्ज करावेत सदर आपल्या अर्जाचे त्या दिवशी निराकरण झाल्यास सदर योजना मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी त्यांच्याशी संवाद साधून वेळेनुसार योजनेचा लाभ घ्यावा