शेवगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
शेवगाव पोलीस स्टेशनच्या पोलीसांची अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई- १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त....
शेवगाव प्रतिनिधी :- श्री यशवंत पाटेकर
शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गु.र.नं ४४२/२०२३, आणि गु.र.नं ४३७/२०२३ कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि २६/05/2023 रोजी सकाळी ९:१० वाजता मुंडे चौक बोधेगाव येथे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक ३२ क्यु ३७७२ डंपर रोडवरून जात असताना त्यास थांबविले असता डंपर चालकास ताब्यात घेऊन त्यांस नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव एकनाथ पांडुरंग मिसाळ वय ३४ वर्षे राहणार बोधेगाव तालुका शेवगाव असे सांगितले सदर डंपर चालकास वाळू वाहतूकीच्या परवाना बाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दि २४/05/2023 रोजी भगतसिंग चौक शेवगाव या ठिकाणाहून टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक १७ ए जी ५०५० डंपर चालकास वाळू वाहतूक सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल परवाना संदर्भात माहिती विचारली असता सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही कारवाईमध्ये तब्बल १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अप्प़र पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके सो श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी,सपोनि/आशिष शेळके,चापोना/ रविंद्र शेळके,चापोना/बाळासाहेबनागरगोजे ,पोकॉ/ बप्पासाहेब धाकतोडे,पोकॉ/ राहुल खेडकर यांनी सदरची कामगिरी केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात भागात व काही गावात गावचे काही गांव पुढारी सजाचे तलाठी व त्या भागातील सर्कल यांना चिरी मिरी देऊन गौण खनिज उत्खनन राजरोस शासनाच्या नाकावर टिचून करत आहेत यांचे धागेदोरे शेवगांव चे कर्तव्यदक्ष पोलीस निश्चित शोधुन काढतील अशी अपेक्षा यां भागातील सर्वसामान्य नागरिकांना आहे
शेवगांव महसुल च्या काही कर्मचाऱ्यांचा अजब कारभार हप्ता देतो त्याला पायघड्या आणि कर्जबाजारी होऊन गाड्या घेतलेल्या तरुणांना मातीत गाडा.