*काटोल येथील समस्या तातडीने सोडविणार: प्राजक्त तनपुरे*

काटोल: 18 फेब्रुवारीला काटोल तालुक्यात राज्याचे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आला त्या बैठकीत नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलननाला भेट देऊन त्यांच्या समस्या सोडण्याचे आदेश मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आला. काटोल येथील ग्रामीण रुग्णालयातील समस्या लवकरच निकाली काढू व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय यात रूपांतर होणार यांची गव्ही दिली घरकुल संबंधित ज्या निधीचा समस्या आहेत. तातडीने निपटारा करू असे राज्याचे नगरविकास मंत्री तानपुरे यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. जंगलीमेंढेपठार ते पंचधार डांबरीकरण नगरपरिषदेतील गडपुरा ते जलालखेडा सिमेंट डांबरीकरण रोडचे लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उमबंकर तहसीलदार अजय चरडे ,मुख्यअधिकारी धनंजय बोरीकर गट विकास अधिकारी संजय पाटील जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख,पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे,उपसभापती अनुराधा खराडे व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू हरणे,समीर उमप आदी उपस्थित होते.

*काटोल येथील समस्या तातडीने सोडविणार: प्राजक्त तनपुरे*
*काटोल येथील समस्या तातडीने सोडविणार: प्राजक्त तनपुरे*