*गुढी पाडव्यापासून विठूमाऊलीचे पदस्पर्श दर्शन होण्याची शक्यता.*
बि पि एस राष्ट्रीय न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. वारकरी संप्रदाय यांची मनातील व्यथा गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी काळा पासून विठूमाऊलीच्या पदस्पर्शाने चे दर्शन बंद आहे. लवकरच गुढीपाडव्यापासून विठू माऊलीच्या पदस्पर्शा चे सर्वांना दर्शन व्हावे असा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून माऊ माऊलीच्या स्पर्शाचे दर्शन बंद होते व शासनाच्या नियमाप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचेे काटेकोरपणे पालन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व वारकरी संप्रदाय यांनी नियमाचे पालन केले.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोना हा जवळ जवळ संपत आला आहे हे लक्षात घेता विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या गुढीपाडव्यापासून माऊलीच्या पदस्पर्शाने चे दर्शन घेता यावे यासाठी ऑनलाईन मीटिंग बैठक घेण्यात आली.
या बैठकी दरम्यान माऊलीच्या पदस्पर्श संदर्भात व पूजा-अर्चा संदर्भात विचार विनिमय व चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान शासनाला याचा पाठपुरावा देऊन परवानगी मागण्यात आली. कारण 31 मार्च पासून बहुतांश सरकारचा असा निर्णय आहे की कोरोना वरील सर्व निर्बंध हटवण्याची माहिती सरकार कडून आलेली आहे.
या विचारानुमते हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च 2020 पासून पदस्पर्श चे दर्शन बंद आहे व जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय यांना दर्शनाच्या लाभ व्हावा याकरता हा निर्णय घेण्यात येत आहे.
कारण मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक आशा राज्यातून आणि नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, देहू, आळंदी या ठिकाणाहून दिंडी पायी पालखी येत असतात. एकंदरीत लक्षात घेता वारकरी यांच्या हृदयामध्ये विठूमाऊली जणू बसलेली असते. ना खाण्याचा ठिकाणा, ना झोपण्याचा ठिकाना अशा भक्तीमध्ये नाहून भक्त पंढरीला विठूमाऊली च्या दर्शनाला जात असतात.
कारण दोन वर्षापासून मंदिर व पदस्पर्श दर्शन बंद असल्यामुळे वारकऱ्यांच्या मनात खंत वाटत आहे कारण असे बहुतांश वारकरी आहेत की दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. कित्येक वर्षापासून मंदिर बंद नव्हते पण ह्या कोरोना महामारी एक मोठं संकट आपल्या भारतावर आलेले दिसून आलं पण महाराष्ट्रातल्या भारतातल्या नागरिकांनी कोरूना चे काटेकोरपणे पालन केले व कोरोना कमी व्हायला मदत झाली.
मागील दोन वर्षांमध्ये कार्तिकी, आषाढी या सारखे अशा प्रमुख यात्रा सुद्धा रद्द होत्या पण आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्या असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी समिती कडून हा निर्णय घेण्यात येत आहे आणि ह्याला कुठेतरी वारकऱ्यांना समाधान मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
सर्व वारकरी संप्रदाय कडून विठ्ठल रुक्मिणी समितीचे आभार व्यक्त केले जात आहे.