केंद्रीय पोलीस ऑफिसर रामदास भाऊराव गायकवाड सेवानिवृत्त

केंद्रीय पोलीस ऑफिसर रामदास भाऊराव गायकवाड सेवानिवृत्त

उंबरे गावचे सुपुत्र व ज्यांनी केंद्रीय पोलीस दलात ३३ वर्ष कार्य केले  आशा रामदास भाऊराव गायकवाड CISF केंद्रीय सश्स्त्र पोलीस दल (गृहमंत्रालय) शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ ASI/EXE यांची सेवा निवृत्त होत आहे.

त्यांनी त्यांच्या जीवनातील जो अमूल्य काळ देशसेवेसाठी खर्च केलेला आहे हे त्यांचे त्याचप्रमाणे उंबरे गावांचे भाग्य आहे

जीवनाची सुरुवात करताना अतिशय गरीब परिस्थितीतून यांनी वाटचाल केली होती परंतु जिदद आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले ध्येय साध्य केल .

आणि त्यांच्या जिदद आणि कर्तुत्वाचे चीज आज आज भ्तालेल आहे. त्यांच्या कर्तव्य पूर्ती सोहळ्यास ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनेक मित्र परिवार आपला मित्र परत येणार व आपल्यात लहानपणीचा तो काळ व्यतीत केला होता,तो पुन्हा जागा होणार

जुन्या आठवणींना उजाळा मिळणार या भावनेने आनंदी भराले आहेत

उंबरे ग्रामस्थांच्या वतीने ०१/०४/२०२२ रोजी त्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या कर्तव्य पूर्ती सोहळ्यासाठी नातलग, आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे