मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चा अनोखा उपक्रम, किल्ले सज्जनगडावर श्रमदानाने मोहीम केली यशस्वी
सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न झाली.दुर्ग संवर्धन करणाऱ्या या प्रतिष्ठान च्या तरुणांची या मोहिमेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला होता.पावसाला सुरवात होण्यापूर्वी गडावरील पूर्ण प्लास्टिक व इतर कचरा साफ करण्याचे ध्येय समोर ठेवत ही मोहीम राबविण्यात आली.विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच हा गड चढण्यासाठी सुबक पायऱ्या आहेत .परंतु या पायऱ्यावर काही प्रमाणात कचरा होता तो देखील पुर्ण स्वच्छ करण्यात आला.या मोहिमेत सातारा तालुका मोहिम विभाग प्रमुख कु.कुंदन जाधव तसेच कु.संतोष विचारे कु.नवनाथ चाळके कु.प्रथमेश पाटील कु.शुभम सुतार कु.आकाश पाटील कु.आकाश माने कु.वेदांत गायकवाड कु.प्रियंका ताई पाटील कु.ऋषिकेश हावले श्री.संतोष बिचके आदी पदाधिकारी उपस्थित होते