सुभाष हिंदी प्राथमिक शाळा सावनेर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला .
सुभाष हिंदी प्राथमिक शाळा सावनेर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला .
ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख
सावनेर : (28 नोव्हेंबर ),
संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणे हा आहे. हा दिवस संविधान दिन(Constitution Day) म्हणून साजरा केला जातो.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.
त्याअनुषंगाने सावनेर शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सुभाष हिंदी प्राथमिक शाळा येथे संविधान दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापिका फरिदा अतिक सय्यद यांच्या मार्गदरशनाखाली शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्या सोबत जनजागृती रॅली काढण्यात आली . यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यारपन करून अभिवादन केले .
तसेच प्रसूतीच्या कळानी विव्हळत असलेल्या महिलेच्या मदतीला एक शाळकरी मुली राजनंदिनी डेहरीया ह्या मुलीनं जे धाडशी कौतुकस्पद कार्य केला , राजनंदिणीच्या अशा माणुसकी दर्शविणारा कार्याला सर्वस्तरावर कौतुक होत आहे . म्हणुन सुभाष हिंदी प्राथमिक शाळातर्फे माजी विद्यार्थि रजनंदिनी ह्याला पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले .
यावेळी सुभाष हिंदी प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापिका फरीदा अतीक सय्यद , जयप्रकाश हेडाऊ, शिल्पा रंगारी , रजनी गौर, सुनीता नाईक , चांडक मैडम, सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील पारवे , चंद्रकला पारवे , शिक्षण समिती अध्यक्ष मनीषा कामळे , पालक सदस्य इत्यादि शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.