सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनई -कांगोणी रोड वडघुले वस्ती येथे 36 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना..

सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनई -कांगोणी रोड वडघुले वस्ती येथे 36 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना..

अहिल्यानगर// जिल्हा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यात दिवसें दिवस गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होताना दिसून येत असून गेल्या महिन्यातच चांदा येथे खुनाची घटना ताजी असतानाच सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुणाची दुसरी घटना घडली आहे.

 

         मागील महिन्यात चांदा येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत.त्यातच ही घटना घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 याबाबतचा सविस्तर वृत्तान्त असा आहे की हिराबाई दत्तात्रय वडघुले वय वर्ष साठ राहणार वडघुले वस्ती कांगोणी रोड सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कांगोणी सोनई रोड वडगुली वस्ती येथे गणेश दत्तात्रय वडघुले वय 36 नामक युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे .

 

यातील फिर्यादी मयत व आरोपी हे एकमेकांच्या घराजवळ राहण्यास असुन ते एकमेकांचे नातेवाईक आहे. आरोपींमध्ये मयत गणेशचा चुलता, चुलतभाऊ व चुलत भावजई यांचा समावेश आहे . 

 

आरोपी यांनी यांनी यातील मयत हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरुन आरोपींनी त्याचे हातातील कोयत्याने ,लोखंडी पाईपने , शेतीकामासाठी लागणाऱ्या खोऱ्याने व जमीनीवर पडलेला लाकडी ठोकळा उचलून यातील मयत याचे डोक्यात मारुन त्यास जिवे ठार मारले व यातील फिर्यादी ही त्यांचे भांडणे सोडवण्यासाठी गेली असता आरोपीने तिला हाता चापडीने मारहाण केली .अशा प्रकारचे वृत्त खूणाच्या प्रसंगी घडल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. तसेच अंगठ्याजवळ मारहाण करुन जखमी केले आहे अशा फिर्यादी वरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे

 

       सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना मार लागल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

      पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली  सोनई पोलीस  व अंमलदार करीत आहेत .

      .